Raj Thackeray : महाराष्ट्रात 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं असून सध्या प्रचाराला जोरदार सुरुवात झालीये. मुंबई सह इतर महापालिकांमध्ये शिवसेना UBT आणि मनसे पक्षाने युती केली असून ते ही निवडणूक एकत्र लढतायत. यापैकी मुंबई महापालिकेची निवडणूक सध्या बरीच चर्चेत आहे. मुंबईतील मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी लढणारे दोन पक्ष एकत्र निवडणूक लढवत असल्याने एक वेगळं वातावरण पाहायला मिळतंय. यंदाच्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना 145 ते 150 जागा लढवतेय तर मनसेला 65 ते 70 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे शिवसेने सोबत युती करताना मनसेने पडती बाजू घेतली का? या प्रश्नावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी झी २४ तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत उत्तर दिलं.
झी 24 तासच्या टू द पॉईंट विथ कमलेश सुतार या कार्यक्रमात शनिवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत पार पडली. यावेळी शिवसेने सोबत युती करताना मनसेने पडती बाजू घेतली का? या प्रश्नावर उत्तर देताना ठाकरे म्हणाले की, 'माझ्यासाठी आता पडती बाजू वगरे महत्वाचं नाही. मी ही निवडणूक मराठी माणसासाठी लढतोय. पक्ष तर सुरूच राहील, पण उद्या जर या महाराष्ट्रातील मराठी भाषाच संपली आणि मराठी माणूसच जर संपला तर राजकीय पक्ष तरी कोणासाठी काढायचाय'.
मनसेच्या सभांना गर्दी होते पण त्याचं मतांमध्ये रूपांतर का होत नाही यावर उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की, 'निवडणूका आणि त्याच्या पार्शवभूमीवर जे काही चाललंय ते 2014 पासून चाललंय. त्याचा फटका एकटा मलाच बसलेला नाही. म्हणजे जवळपास 60 वर्ष ज्या पक्षाने देशावर राज्य केलं त्या काँग्रेस पक्षाला सुद्धा बसतोय. आत तुम्ही बिहारमध्ये बघितलं तेजस्वी यादवच्या सभांना प्रचंड गर्दी होती, मग काय झालं त्या मतांचं. असं कसं होऊ शकतं. लोकांना विचार पटल्या शिवाय एवढ्या संख्येने लोकं येणारच नाहीत'.
मराठी माणसासाठी महाराष्ट्रासाठी ठोस भूमिका घेऊन सुद्धा मतपेटीत त्याचं रूपांतर होत नाही अशा वेळी फ्रस्ट्रेशन येतं का? या प्रश्नावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, 'जेव्हा यश येत नाही तेव्हा मी बाळासाहेबांचा विचार करतो की बाळासाहेब एवढं करत होते पण त्यांनाही यश खूप उशिरा यायला लागलं. भारतीय जनता पक्षाचं बघितलं तर 52 साली जन्माला आलेला भारतीय जनता पक्ष त्यांच्या हातात सुद्धा 2014 मध्ये बहुमत आलं. आता प्रश्न असा आहे की इतकी वर्ष बाकीचे लोक काम करतायत किंवा करायचं आहे. तेव्हा आम्हीही करू'.
पूजा सुनील पवार या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा ५ वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सकाळ वृत्तपत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर बातम्या आणि फिल्ड रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. त्यानंतर नवभारत पासून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे न्यूज १८ लोकमतमधून स्पोर्ट्स सेक्शनसाठी काम केले. सध्या झी २४ तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल या क्षेत्राशी निगडीत बातम्या देखील करते. फावल्यावेळेत सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्यायला तसेच ट्रॅव्हल करून नवनवीन ठिकाण फिरण्याची आवड आहे.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.