जयेश जगड, झी मीडिया, अकोला : आज सकाळी आठच्या सुमारास 'संस्कृती संवर्धन समिती'च्या वतीनं नववर्षाच्या स्वागतासाठी महारॅलीचं आयोजन केलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यानिमित्तानं आज पारंपरिक मराठमोळ्या वेशभूषेतील स्त्री-पुरुषांनी शहरातील मुख्य मार्गावरून  मोटर-सायकल रॅली काढली.


शहराचे ग्रामदैवत असलेल्या राजेश्वर मंदिरातून सकाळी आठ वाजता या रॅलीचा प्रारंभ झाला. अकोल्यातील मुख्य मार्गांवरून मार्गक्रमण करीत या रॅलीचं बिर्ला राम मंदिरात विसर्जन करण्यात आलं.


राज्याचे गृहमंत्री श्री रणजित पाटील आपल्या कुटुंबासह या नववर्षाच्या रॅलीत सहभागी झाले. तसंच शिवसेनेचे आमदार गोपीकिशन बाजोरिया विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत हजारोच्या संख्येने अकोलेकरांनी उपस्थिती नोंदवित नववर्षाचं स्वागत केलं.


अकोलेकरांनी ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करीत या रॅलीचं जोरदार स्वागत केलं. 'संस्कृती संवर्धन समिती' गेल्या बारा वर्षांपासून गुडीपाडव्याचं स्वागत करण्यासाठी या रॅलीचं आयोजन करीत आहेत.