आण्णा नाईकच्या डायलॉगने उदयनराजेंकडून शिवेंद्रराजेंना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा

या शुभेच्छांची सध्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा 

Updated: Mar 30, 2021, 05:18 PM IST
आण्णा नाईकच्या डायलॉगने उदयनराजेंकडून शिवेंद्रराजेंना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा

सातारा : सातारा-भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले (MLA Shivendraraje Bhosale) यांचा आज वाढदिवस असल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. सर्वच क्षेत्रातील मंडळी शिवेंद्रराजेंना शुभेच्छा देत आहेत. पण खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनी दिलेल्या शुभेच्छा शिवेंद्रराजेंसाठी विशेष ठरतायत. या शुभेच्छांची सध्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरु आहे.

उदयनराजे-शिवेंद्रराजेंमध्ये पुन्हा 'मिले सूर मेरा तुम्हारा' | Satara  Udyanraje And Shivendra Raje Came Togeather

उदयनराजे हे राजकारणासोबत आपल्या हटके स्टाईलसाठी ओळखले जातात. याच हटके स्टाईलने त्यांनी शिवेंद्रराजेंना शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या झी मराठीवरी रात्रीस खेळ चाले ही मालिका खूप चर्चेत आहे. यातील आण्णा नाईक हे पात्र आणि त्याचे डायलॉग्स लोकांच्या तोंडावर पाहायला मिळतात. हे डायलॉग सोशल मिडियात खूप व्हायरल होत आहेत. 

याच डायलॉगचा आधार घेत उदयनराजे यांनी शिवेंद्रराजे यांना शुभेच्छा दिल्या. 'अण्णा नाईक असो मी' या डायलॉगची आठवण करून देत 'शिवेंद्रराजे असो मी' असा डायलॉग म्हणून दाखवत शुभेच्छा दिल्या. शिवेंद्रराजेंना माझ्या नेहमीच शुभेच्छा आहेत, त्यांचं जोरात काम आहे असे उदयनराजे म्हणाले.