म्युकरमायकोसिस उपचारावर 1.5 कोटींच्या खर्चानंतर जीव वाचला, मात्र डोळा गमावला

म्युकरकायकोसिसच्या उपचारांवर (Mucormycosis Treatment) तब्बल दीड कोटीचा खर्च झाला आहे. 8 महिने त्यांचे म्युकरमायकोसिसवर उपचार सुरू होते.  

Updated: Jun 10, 2021, 12:57 PM IST
म्युकरमायकोसिस उपचारावर 1.5 कोटींच्या खर्चानंतर जीव वाचला, मात्र डोळा गमावला

अमर काणे / नागपूर : कोरोना (coronavirus) वा म्युकरमायकोसिसच्या (Mucormycosis) अनेक  रुग्णांचे उपचारावर लाखोंचा खर्च होताना दिसतात. मात्र नागपुरातील नवीन पॉल यांना म्युकरकायकोसिसच्या उपचारांवर (Mucormycosis Treatment) तब्बल दीड कोटीचा खर्च झाला आहे. 8 महिने त्यांचे म्युकरमायकोसिसवर उपचार सुरू होते. त्याकरिता नागपूर, हैद्राबाद आणि मुंबई येथील सहा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार घेतले. त्यांचे  डोळे, जबड्यासह 13 शस्त्रक्रिया करण्यात आल्यात. म्युकरचे निदान लवकर न झाल्यानं नवीन यांना एक डोळा गमवावा लागला मात्र या भयावह आजारातून त्यांनी आता कमबॅक केला आहे.

46 वर्षीय नवीन पॉल यांचा म्युकमायकोसविरुद्धचा लढतानाचा संघर्षाची कहाणी सांगताना ते आणि त्यांच्या पत्नी संगिता यांना अश्रू आवरता आले नाही. एक दोन महिने नव्हे तब्बल 8 महिने नवीन पॉल यांचा म्युकोरविरुद्धचा लढा सुरु होता. म्युकरच्या उपचाराकरिता लागलेला खर्च तर सुन्न करणार आहे. तब्बल 1.5 कोटी रुपयांचा खर्च म्युकोरच्या उपचाकारकरिता त्यांना आतापर्यंत लागला.

सप्टेंबरच्या तिस-या आठवड्यात नवीन यांना कोरोनाची लागण  झाली..त्यानंतर ऑक्टोबरपासून त्यांचा म्युकोरचा त्रास सुरु झाला.त्याकरता त्यांनी नागपूर,हैद्राबाद आणि मुंबई येथील सहा मोठ्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु झालेत. त्यांचे सायनस, डोळे आणि जबड्यावर 13  शस्त्रक्रियाकरण्यात आल्या. 50च्यापेक्षा जास्त स्कॅन, एक्से ,एएमआरय काढलेय. म्युकरने नवीन यांना एक डोळा गमवावा लागला.

नवीन पॉल हे नागपुरात  GSTमध्ये कार्यरत आहे. तर त्यांच्या पत्नी संगिता दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत आहे. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये त्यांना म्युकरमायकोसिसने जेव्हा त्यांना  ग्रासले त्यावेळी त्याबाबत नागपुरात खूप अभ्यास नव्हता. त्यामुळे म्युकरचे निदानासाठी महिन्यांचा अवधी लागला. सुरुवातीला नवीन नागपुरातील एका न्यूरॉलॉजी रुग्णालयात ते उपचाराकरिता दाखल झाले. तेथून त्यांना हैदराबादच्या रुग्णालयात पाठविण्यात आले. तेथील उपचारानंतर पुन्हा नागपुरातील खासगी रुग्णालयात दाखल केले गेले. तेथेही काही शस्त्रक्रियांनंतर मुंबईतील एका नामांकित कार्पोरेट रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. तिथे म्युकरचे निदान झाले. त्यांच्यावर तीन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. 

मुंबईतील रुग्णालयात तब्बल 19 लाख रुपयांचा खर्च आला. त्यापूर्वी 45 लाखांचा खर्च अगोदरच्या उरचारदरम्यान लागले होते.त्यामुळं मुंबईतील  खर्च परवडणार नसल्याने ते पुन्हा नागपुरातील मेडिट्रिना या खासगी रुग्णालयात दाखल झाले. या खासगी रुग्णालयचा रेल्वेशी मेडिकल करार आहे.. अगोदर सुमारे 45 लाखांपेक्षा जास्त  रुपयांचा खर्च झाल्यामुळं  नवीन पॉल यांनी मेडिट्रिना येथे उपचार सुरु केला. तिथे त्यांचा एक डोळा आणि वरचा जबडा काढावा लागाल. मात्र नवीन पॉल यांचा उपचाराला प्रतिसाद मिळत होता. त्यानंतर तिन महिन्यांच्या उपचारानंतर म्हणजे मार्चपर्यंत त्यांच्यात सुधारणा झाली. नागपुरात खासगी रुग्णालयचा 3 महिन्यांचे उपचाराचे 1 कोटी 4 लाख रुपये बिल आले. रेल्वेच्या या खासगी हॉस्पिटलशी मेडिकल करार असल्याने त्या कराराअंतर्गत देण्यात येतो.

नवीन यांना ऑक्टोबरपासून म्युकोरचा त्रास होता. मध्य भारतातील ते कदाचीत कोरोनानंतर म्युकोर झालेले पहिले रुग्ण असावेत. त्यांना म्युकोर निदान होण्यास उशीर झाला. शस्त्रक्रिया करून काढलेल्या डाव्या डोळ्याच्या ठिकाणी सिरॅमिकचा डोळा बसविल्यानंतर आणि दातावरील शस्त्रक्रियेनंतर म्युकर मायकोसिसपासून त्यांची सुटका होईल. म्युकोरच्या इतक्या वेदना सहन केल्यानंतर नवीन यांची जबरदस्त इच्छाशक्ती त्यांच्या उपचारात उपयुक्त ठरली. 

उपचारादरम्यान नवीन पॉल यांचा औषधाउपचाराचा दिवसाचा खर्च लाखोंत होता. पॉल दाम्पत्यानं पीएफमधील रक्कम असो वा बचतीची जमा केलेली सर्व रक्कम उपचारावर खर्च झाली. संगिता यांनी घरचे सगळे  दागिने गहाण ठेवावे लागले. शिवाय नातेवाईक आणि मित्रमंडळींनी मोठी आर्थिक मदत केली. सगळ्यात महत्वाचं नवीन यांच्या उपाचारादरम्यान संगीता यांची खंबीर मानसिक साथ मिळाली. सातत्याने नवीने यांचे मनौधैर्य त्या वाढवत होत्या. म्युकर उपचारांकरता झालेला दीड कोटींचा खर्च, आठ महिन्यांचा कालावधी आणि यानंतर गमावाव लागलेला एक डोळा यातून आता नवीन पुन्हा नव्या उमेदीनं कार्यलयात रुजू झाले आहेत.