Dadar Accident : होळीसाठी फुले आणायला गेलेल्या तिघांना शिवनेरी बसने चिरडले, एकाचा मृत्यू दोघे गंभीर

Mumbai Accident News: मुंबईत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भरधाव वेगात असलेल्या बसने तिघांना चिरडले 

मानसी क्षीरसागर | Updated: Mar 13, 2025, 11:23 AM IST
Dadar Accident : होळीसाठी फुले आणायला गेलेल्या तिघांना शिवनेरी बसने चिरडले, एकाचा मृत्यू दोघे गंभीर
Mumbai Accident 29 year old Biker Killed In Head On Collision With Overspeeding shivneri bus

Mumbai Accident News: मुंबईत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शिवनेरी बस चालकाने तिघांना चिरडल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे तर अन्य तिघे गंभीर जखमी आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

बेदरकारपणे गाडी चालवणाऱ्या MTDC बस चालकाने तिघांना चिरडल्याची घटना प्रभादेवी ब्रिजवर मध्यरात्री 2.30 वाजता घडली. प्रणय बोडके (29), करण शिंदे (29) आणि दुर्वेश गोरडे हे तिघेजण स्कुटरवरून परेलवरून दादरला होळीसाठी फुले आणण्यास चालले होते. त्याचवेळी समोरून शिवनेरी बस चालकाने ब्रिजवरुन चुकीच्या दिशेने भरधाव वेगाने आला. 

बस चुकीच्या दिशेने घेऊन आल्यानंतर समोरुनयेत असलेल्या दुचाकीला धडक दिली. भरधाव वेगात आलेल्या शिवनेरी बस चालकाने तिघांना चिरडले. यामध्ये प्रणय बोडके याचा केईएम रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर दुर्वेश आणि करण गंभीर जखमी असून त्यांच्यावर ग्लोबल रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

इकबाल शेख असे चालकाचे नावं असून तो MSRTC ची निळ्या रंगाची बस  MH12VF3305 चालवत होता. चालक पळून जाण्याच्या तयारीत असताना उपस्थित लोकांनी त्याला पकडून भोईवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले.

मुंबई-गोवा महामार्गावर बर्निंग कारचा थरार 

शिमगोत्सवासाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांच्या कारला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर सुकेळी खिंडी जवळ आग लागली. गाडी मधून प्रवास करणारे तिनही प्रवासी सुरक्षित असले तरी कार आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. सी एन जी किट जळून खाक झालं. कारमधून स्फोटाचे जोरदार आवाज येत होते. महामार्गावर भीती निर्माण झाली होती त्यामुळे काही काळासाठी वाहतूक थांबवण्यात आली होती.