कोर्टात चॅटिंग दाखवले आणि जामीन मिळवला; मुंबईत अल्पवयीन तरुणीचा विनयभंग

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या  आरोपीला दिंडोशी कोर्टाने केला जामीन मंजूर केला आहे. परस्पर संमतीने संबंध होते असा दावा आरोपीने केला आहे.

Updated: Mar 23, 2025, 04:26 PM IST
कोर्टात चॅटिंग दाखवले आणि जामीन मिळवला; मुंबईत अल्पवयीन तरुणीचा विनयभंग

Mumbai Crime News : सायकल विक्रेत्याने एका अल्पवयीन मुलीचा लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. तरुणीच्या  कुटुंबियांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली मात्र,  सदर तरुणी माझ्या संपर्कात असून सहमतीने जवळीक झाल्याचा दावा करत चॅटिंग पुरावा म्हणून कोर्टात सादर केले. यानंतर कोर्टाने आरोपीला जामीन मंजूर केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 

 मुंबईच्या मालवणी पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्या अंतर्गत दाखल गुन्ह्यात सायकल व्यापाऱ्याला दिंडोशी सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.  सागर अरविंद कोटक (वय 45 वर्षे) असे  आरोपीचे नाव आहे. सायकल देण्याचे आमिष दाखवून पीडित अल्पवयीन मुलीला बोलाविला होता आणि नंतर रिक्षा मध्ये जाताना मुलीचा विनय भंग करण्याचा प्रयत्न केला होता. पीडित अल्पवयीन ही 17 वर्षांची आहे. 

पीडित अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांनी आरोपी विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. पिडित तरुणी ही आपल्या कुटुंबियासमवेत आरोपीच्या दुकानात छोट्या बहिणीला सायकल घेण्यासाठी गेली होती. मात्र, महाग असल्याने त्यांनी सायकल खरेदी केली नाही. यावेळी आरोपीने सदर मुलीला आपले व्हिजिटींग कार्ड देत स्वस्त किंमतीत सायकल मिळवून देतो असे सांगितले. यानंतर मुलीले आरोपीशी संपर्क साधला. 

दरम्यान आरोपीने मुलीला भेटायला बोलावले. यावेळी आरोपीने रिक्षात तरुणीचा विनयभंग गेला. यानंतर मुलीचे वागणे बदलल्याचे पाहून तिच्या घरच्यांनी तिची विरापूस केली असता हा सर्व प्रकार उजकीस आला. पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, आरोपीने मुलगी माझ्या संपर्कात असून मी तिच्यावर कोणतीही जबरदस्ती केली नसल्याचे सांगत आरोपीने पोलिसांनी चॅटिंगचे पुरावे दाखवले. यानंतर पोलिसांनी आरोपीला जामीन मंजूर केला आहे.