Mumbai Goa Highway Parshuram Ghat: मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे परशुराम घाट. मुंबई-गोवा महामर्गावर रत्नागिरी चिपळूण दरम्यान परशुराम घाट लागतो. मात्र, हाच परशुराम घाट मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यासांठी धोकादायक ठरत आहे. परशुराम घाटात वारंवार संरक्षण भिंत कोसळण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे या समस्येवर तोडगा शोधण्यासाठी  मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील मातीचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. 


हे देखील वाचा... एका मुस्लिम राजाने बांधलेले महाराष्ट्रातील एकमेव दत्त मंदिर; दत्तसंप्रदायची राजधानी असलेले प्रसिद्ध तीर्थक्षेत्र


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रत्नागिरी - चिपळूण मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात मातीच्या सर्वेक्षणाच्या कामाला सुरवात झाली आहे. पावसात सतत कोसळणाऱ्या संरक्षक भिंत कोसळण्याचा घटनांची कारणे शोधण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून परशुराम घाटात माती परीक्षण करण्यात येत आहे. माती परीक्षण करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य अभियंता यांच्यासह प्रमुख अधिकारी परशुराम घाटात दाखल झाले. माती परीक्षण झाल्यानंतर आवश्यतेनुसार घाटातील संरक्षक भिंत उभारण्याची नवी डिझाईन तयार केली जाणार. सतत होणाऱ्या दुर्घटनेमुळे प्रशासनाकडून कार्यवाहीला सुरवात करण्यात आली आहे. 


12 वर्षांपासून रखडलेयं मुंबई गोवा महामार्गाचे काम


मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र कामाचा वेग खूपच कमी आहे. कामाची गती पाहता या मार्गावरील अनेक पुलांची कामे पूर्णत्वास जाऊ शकली नाहीत. नागोठणे, कोलाड, पुई, माणगाव, लोणेरे आणि टेमपाले इथल्या प्रमुख पुलांची कामं रखडलेली आहेत. त्यामुळे शासनकर्त्यांनी दिलेली डेडलाइन पुन्हा हुकणार आहे. महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे कोकणवासी त्रस्त आहेत. 12 वर्षांपेक्षा अधिक काळ चाललेलं हे काम कधी पूर्ण होणार असा सवाल उपस्थित होतोय