Western Railway : लोकल ट्रेन ही मुंबईची लाईफालाईन आहे. रोज लाखो प्रवासी लोकलने प्रवास करतात. लोकलच्या वेळापत्रकानुसार मुंबईकर धावतात. लोकलची वाहतूक अगदी नियोजनबद्ध पद्धतीने सुरु असते. मात्र, मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावर अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. एकच ट्रॅकवर दोन लोकल ट्रेन समोरा समोर आल्या आहेत.
पश्चिम रेल्वे मार्गावरील मिरा रोड रेल्वे स्टेशनजळ हा धक्कादायक प्रकार घडला आहे, एकच ट्रॅकवर दोन लोकल ट्रेन समोरा समोर आल्याची घटना घडली. मुंबईत पहिल्यांदाच अस काही तरी घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकरामुळे प्रवाशी मात्र गोंधळून गेले.
दादरकडून वसईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर मिरा रोड रेल्वे स्टेशन येथे प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वर एकच रेल्वे ट्रॅकवर दोन लोकल ट्रेन आल्या. ट्रेन चालकाच्या सतर्कतेमुळे काही मीटर अंतरावर दोन्ही ट्रेन थांबवण्यात आल्या. यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
Mira Road | पश्चिम रेल्वेवर मोठा अनर्थ टळला;एकच ट्रॅकवर दोन लोकल ट्रेन अमोर- समोर| Zee24Taas#miraroad #railway #zee24taas pic.twitter.com/GH5Ujmhe22
— ZEE २४ तास (@zee24taasnews) January 15, 2025
वसई रेल्वे स्थानकावर RPF जवानाचा एका प्रवाशाने चावा घेतला. डहाणू लोकल सकाळी वसई रेल्वे स्थानकावर पोहोचली असता यावेळी आरपीएफ जवानांची एक टीम स्थानकावर तैनात होती....दिव्यांगाच्या डब्यात एक प्रवासी बसला होता त्याला आरपीएफ जवानांनी खाली उतरण्यास सांगितलं.मात्र तो हुज्जत घालत होता.या दरम्यान एक जवान डब्यात चढला आणि त्याला खाली उतरवंलं. याच रागाच्या भरात आरपीएफ जवानाच्या हातावर प्रवाशाने जोरदार चावा घेतला आणि स्थानकावर धक्का बुक्की केली ... अखेर त्याला उचलून रेल्वे पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात. यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.
...Read More|
SCO
(20 ov) 170/7
|
VS |
NEP
171/3(19.2 ov)
|
| Nepal beat Scotland by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
CAN
(20 ov) 173/4
|
VS |
NZ
176/2(15.1 ov)
|
| New Zealand beat Canada by 8 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
AUS
(20 ov) 181
|
VS |
SL
184/2(18 ov)
|
| Sri Lanka beat Australia by 8 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.