धोका वाढतोय! मुंबईत कोरोनाचा फैलाव? दोन संशयित कोरोनाबाधितांच्या मृत्यूनं वाढवली चिंता

Corona Virus News : कोरोना संसर्ग पुन्हा एकदा धास्ती वाढवत असून, आशियाई देशांमध्ये होणाऱ्या या विषाणूच्या संसर्गामुळं आरोग्य यंत्रणासुद्धा चिंतातूर झाल्या आहेत.   

सायली पाटील | Updated: May 19, 2025, 08:31 AM IST
धोका वाढतोय! मुंबईत कोरोनाचा फैलाव? दोन संशयित कोरोनाबाधितांच्या मृत्यूनं वाढवली चिंता
(छाया सौजन्य- पीटीआय)/ Mumbai news Covid Cases In India Kem Hospital Two suspect Patients Corona Death with co morbidity

Corona Virus News : आशियाई देशांमध्ये कोरोनाचा फैलाव होत असल्याच्या वृत्तानं पुन्हा एकदा खळबळ माजली असून, आता आरोग्य यंत्रणांनीसुद्धा खबरदारी बाळगण्यास सुरुवात केली आहे. उपलब्ध माहितीनुसार कोरोनाचा संसर्ग आता मुंबईतसुद्धा भीतीत भर घालताना दिसत आहे. 

Add Zee News as a Preferred Source

मुंबईच्या केईएम रुग्णालयात दोन संशयित कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळं शहरात कोरोनाचा शिरकाव झाला का? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. दोन्ही रुग्णांच्या मृत्यूपूर्वी केलेल्या चाचणीमध्ये हे रुग्ण कोरोना बाधित असल्याचं स्पष्ट झाल्यानं भीती आणखी वाढत आहे. मात्र संशयित कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू त्यांना असलेल्या सहव्याधीमुळं झाल्याचं स्पष्टीकरण केईएम रुग्णालयानं दिलं आहे. 

मृतांमध्ये 58 वर्षीय महिलेचा कर्करोगामुळे आणि 13 वर्षीय मुलीचा मूत्रपिंडाच्या आजाराने मृत्यू झाला असल्याचं रुग्णालय प्रशासनाचं म्हणणं आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी या दोन रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळं झाल्याचं म्हटल्यानं केईएम रुग्णालयातील या दोन रुग्णांचे रुग्णांचे मृत्यू नेमके कशामुळं झाले याबाबत संभ्रम निर्माण झाला असून, भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. 

आशियाई देशांमध्ये कोरोनाची दहशत.. 

आशियाई देशांमध्ये एकाएकी कोरोनाची दहशत वाढली असून, हाँगकाँग, सिंगापूरमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळं रुग्णसंख्येत भर पडताना दिसत आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार सिंगापूरमध्ये मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत 28 टक्क्यांची वाढ झाली.  

हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : समोरचं दिसणार नाही इतका पाऊस पडणार; राज्यात पुढचे 5 दिवस नुसता धुमाकूळ!

 

गेल्या दोन आठवड्यांमध्ये भारतही या संसर्गाच्या विळख्यात येत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. साधारण आठवडाभराची आकडेवारी पाहिल्यास देशात गेल्या आठवड्यात 58 नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या आता 93 वर पोहोचली आहे. भारतात कोरोना चाचण्यांची संख्या कमी असतानाही रुग्णसंख्या वाढलेल्यानं आरोग्य यंत्रणांची चिंता वाढली आहे. दरम्यान या परिस्थितीमध्ये घाबरण्याऐवजी सतर्क राहण्याचं आवाहन आरोग्य तज्ज्ञ आणि डॉक्टरांनी केलं आहे. 

 

About the Author

Sayali Patil

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

...Read More