मुंबई :  महाविकास आघाडीत (Mahavikas Aaghadi) सारं काही आलबेल आहे असं नेते सांगतात. मात्र तसं काही नीट आहे असं तरी वाटत नाही. त्याच कारण आहे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार गजानन कीर्तीकर (Gajanan Kirtikar)  यांनी केलेलं वक्तव्य. कीर्तीकरांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतील धुसफूस समोर आली आहे. "आम्ही म्हणायचं ठाकरे सरकार, लाभ घेतं पवार सरकार", असं म्हणत शिवसेना खासदार गजानन किर्तीकरांनी शिवसेनेला घरचा आहेर दिला आहे. (mumbai north west loksabha constituency mp gajanan kirtikar critisize on ncp over to allocation of funds at ratanagiri) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निधी वाटपावरून गजानन किर्तीकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रत्नागिरीत एका कार्यक्रमात बोलताना शिवसेनेला पुरेशा प्रमाणात निधी मिळत नाही. शिवसेनेवर अन्याय होतोय अशी नाराजी त्यांनी बोलून दाखवली. 



कीर्तीकर काय म्हणाले? 


“आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार पण प्रत्यक्ष लाभ कोण घेते, पवार सरकार” असे म्हणत शिवसेनेचे मुंबईतील खासदार व शिवसेनेचे नेते गजानन किर्तीकर यांनी निधी वाटपाबाबत नाराजी व्यक्त करत महाविकास आघाडीला सरकारला घरचा आहेर दिल्याने खळबळ उडाली आहे. 


रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील शिर्दे येथे ब्राह्मणवाडी ते कोळबांद्रे रस्त्याच्या डांबरीकरण कामाच्या भूमिपूजन करण्यात आलं. या समारंभात किर्तीकर बोलत होते. 


"एका आमदाराला त्याच्या मतदार संघात विकास कामासाठी शासनाकडून निधी मिळविण्यासाठी मोठे प्रयत्न करावे पाहावे लागते, विकास कामांच्या निधीमध्ये पळवापळव केली जात असून ग्रामविकास मंत्रालयाच्या २५ /१५ योजनेमधून निधी मिळवण्यासाठी मोठी स्पर्धा पाहायला मिळते.  आम्हाला मुंबईमध्ये हा प्रश्न उद्भवत नाही, मुंबईमध्ये नागरोत्थान, नगरविकासचा निधी मिळतो, मुख्यमंत्र्यांच्या मागे लागून आम्ही निधी मिळवतो, मात्र निधीची पळवापळवी केली जात असून “ आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार पण प्रत्यक्ष लाभ कोण घेतो, पवार सरकार” असे म्हणत त्यांनी निधी वाटपात शिवसेनेवर अन्याय होत असल्याने नाराजी व्यक्त केली.