मुंबई पुण्याच्या मधोमध महाराष्ट्रातील सर्वात खतरनाक प्रोजेक्ट! खोल दरीवर केबलने जोडणारा ब्रीज

 Missing Link : महाराष्ट्रात सर्वात थरारक पूल उभारला जात आहे.  खोल दरीवर पुल बांधण्यात येत असून दोन टोकं केबलने जोडली जाणार आहेत. याचे फोटो पाहूनच धडकी भरेल .  

वनिता कांबळे | Updated: Jan 12, 2025, 09:48 PM IST
मुंबई पुण्याच्या मधोमध महाराष्ट्रातील सर्वात खतरनाक प्रोजेक्ट! खोल दरीवर केबलने जोडणारा ब्रीज

Mumbai Pune Expressway Missing Link :  मुंबई आणि पुण्याच्या मोधमध महाराष्ट्रातील सर्वात खतरनाक प्रोजेक्ट उभारण्यात येत आहे. हा प्रोजेक्ट म्हणजे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील महत्त्वकांक्षी मिसिंग लिंक आहे. सह्याद्रीच्या डोंगरात केबल स्टेड पुल उभरला जात आहे. यामुळे एक्सप्रेस-वे-मार्गे मुंबई पुण्याचा प्रवास आणखी जलद होणार आहे.  हा प्रकल्प जवळपास पूर्णत्वास आला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

हे देखील वाचा... GK : 'भोसरी'चे जुने नाव माहित आहे का? महाराष्ट्राच नाही तर संपूर्ण भारतात सर्वात जास्त चर्तेत असणारे गाव 

एक्सप्रेस-वे-मार्गे मुंबई पुण्याला जोडण्यासाठी मिसिंग लिंक प्रकल्प उभारला जात आहे. हा  महाराष्ट्रातील सर्वात खतरनाक प्रोजेक्ट मानला जात आहे. मिसिंग लिंक प्रकल्पाअंतर्गत सह्याद्रीच्या पर्वत रांगेत असलेल्या खंडाळा घाटात 180 मीटर उंच स्टेड पुल उभारण्यात येत आहे. हा केबल-स्टेड पुल आहे. कारण खोल दरीवर  बांधण्यात येणाऱ्या या पूलाची दोन टोकं केबलने जोडली जाणार आहेत. महाराष्ट्रातील हा सर्वात थरारक पुल मानला जात आहे.   पावसाळ्यामुळे पुलाच्या बांधकामाला अडचणी आल्या होत्या. मात्र, पावसाळ्यानंतर या प्रकल्पाच्या कामाने चांगलाच स्पीड घेतला.  आता हे काम देखील आता प्रगतीपथावर आहे. हा महाराष्ट्रातील सर्वात चॅलेंजिंग प्रोजेक्ट असल्याची चर्चा आहे. कारण, सह्याद्रीच्या डोंगरात अतिशय दुर्गम अशा भागात केबल स्टेड पुल उभारणे हे इंजीनीयर्ससाठी मोठे आव्हान  आहे.  

14 किलोमीटर चा असणाऱ्या या मिसिंग लिंकच्या खंडाळा येथील केबल स्टेड पुलामुळे मुंबईतून पुण्याला जाताना खंडाळा घाट लागणार नाही. फक्त लोणावळ्यात प्रवेश करण्यासाठी या खंडाळा घाटातून जावे लागेल. या मिसिंग लिंक प्रोजेक्ट अंतर्गत खोपोली एक्झिटपासून ते लोणावळ्याच्या कुसगावपर्यंत दोन्ही दिशेनं प्रत्येकी 4 मार्गिकांचे 2 बोगदे उभारण्यात येत आहेत. यातील सर्वांत मोठ्या बोगद्याची लांबी 8.87 किलोमीटर आहे. तर दुसरा बोगदा 1.67 किमी लांबीचा  पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरील मिसिंग लिंक प्रकल्प आता पूर्णत्वाच्या टप्प्यात आला आहे. 

या प्रकल्पाचे 90 टक्के काम पूर्ण झाला आहे. 2025 या वर्षात हा प्रकल्प प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. मिसींग लिंकमुळे मुंबई पुणे या  शहरातील अंतर 6 किमी ने कमी होणार आहे. यामुळे प्रवाशांचा जवळपास 30 मिनीटांचा वेळ वाचणार आहे. 

 

About the Author

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

...Read More