Ajit Pawar on Devendra Fadnavis: महानगरपालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमने-सामने असेल असं जाहीर केलं आहे. यानंतर पुण्यात महायुती होणार नाही हे स्पष्ट झालं आहे. देवेंद्र फडणवीसांच्या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील सर्व 29 पालिकांच्या निवडणुका एकाच वेळी पार पडणार असून, 15 जानेवारीला मतदान होईल आणि 16 जानेवारीला निकालाची घोषणा होईल.
पुण्यात कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा समोरासमोर लढताना दिसेल असं देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. तसंच शिवसेना शक्यतो सर्व ठिकाणी आमच्यासोबत असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं.
"आम्ही महायुती करण्याचा प्रयत्न करत आहोत. जास्तीत जास्त ठिकाणी भाजपा आणि शिवसेनेची युती होईल. काही ठिकाणी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी युती होईल. तर काही ठिकाणी भाजपा-राष्ट्रवादीची युती होतानाही दिसेल. पुण्यात मात्र अजित पवारांची, आमची चर्चा झाली आहे. आम्ही दोघे इथले मोठे पक्ष आहोत. भाजपाने पाच वर्षं पुण्याचा चांगला विकास केला आहे. त्यामुळे कदाचित पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा समोरासमोर लढताना दिसेल. असं असलं तरी ही मैत्रीपूर्ण लढत असेल, कोणतीही कटुता नसेल," असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितंल आहे.
निवडणुकीबाबत मुख्यमंत्री म्हणतील ते अंतिम असेल असं सांगत अजित पवारांनीही स्वतंत्र लढण्याला दुजोरा दिला आहे. तसंच मुख्यमंत्र्यांनी केलेलं विधान चर्चेनंतरच केलं आहे असंही म्हणाले. कोणी एकत्रित आले तरी जनतेच्या मनात असते कोणाला मतदान करायचे आणि कोणाला करायचे नाही असंही ते म्हणाले.
विरोधकांच्या बाजूला गेला तर ईव्हीएम चांगला, आणि त्यांच्या विरोधात गेला की ईव्हीएम मशीनला दोष देतात. मलाही अनेक तक्रारी आहेत. मतदारयाद्या पारदर्शक झाल्या पाहिजेत अशी मागणीही त्यांनी केली आहे.
"29 महापालिका जाहीर केल्या आहेत. सगळे राजकीय कार्यक्रम बदलले. आमच्या निवडणुकी झाल्या, आमदार मंत्री खासदार झालो. पण आमच्यासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहेत. खूप जणांना निवडणुकीत उतरावे असे वाटते असंही ते म्हणाले.
अर्ज दाखल करण्याचा कालावधी - 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर
अर्जाची छाननी - 31 डिसेंबर
उमेदवारी माघारीची मुदत - 2 जानेवारी 2026
निवडणूक चिन्ह वाटप आणि अंतिम यादी - 3 जानेवारी 2026
मतदान - 15 जानेवारी 2026
मतमोजणी - 16 जानेवारी 2026
शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| England beat Australia by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.