Mysterious Lonar Crater Lake: पृथ्वीवरील सर्वात रहस्यमयी ठिकाण आपल्या महाराष्ट्रात आहे. हे ठिकाण जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. हे ठिकाण आहे लोणार सरोवर. थेट विज्ञानाला चॅलेंज देणारे रहस्यमयी लोणार सरोवर पृथ्वीवरील सर्वात चमत्कारिक ठिकाण देखील आहे. NASA चे वैज्ञानिक 50000 वर्ष संशोधन करुन थकले पण त्यांना याचे रहस्य उलगडता आलेले नाही.
लोणार सरोवर म्हणजे पृथ्वी आणि अंतराळाला जोडणारा चमत्कारच आहे. बुलढाणा जिल्ह्यात असलेले लोणार सरोवर हे एक अद्वितीय आणि रहस्यमय नैसर्गिक आश्चर्य आहे. 50,000 वर्षांपूर्वी उल्कापातामुळे हे सरोवर तयार झाले. या सरोवराचे वैशिष्ट्य म्हणजे अग्निजन्य खडकात निर्माण झालेलं खाऱ्या पाण्याचे हे जगातील एकमेव सरोवर आहे.
लोणार सरोवर हे 47000 हजार वर्ष जुनं असल्याचा संशोधकांचा दावा आहे. लोणार सरोवर हे उल्कापातामुळे तयार झाले आहे. एक महाकाया उल्का दख्खनच्या पठारावर धडकली. त्याठिकाणी 1.8 किलोमीटर व्यासाचा आणि 150 मीटर खोल असा प्रचंड खड्डा तयार झाला. या सरोवराला पौराणिक महत्व देकील आहे. ब्रिटिश राजवटीमध्ये जे. ई. अलेक्झांडर यानं या सरोवराची नोंद केली आहे. त्याचबरोबर आईने अकबरी, पद्मपुराण आणि स्कंदपुराणातही या विवराचा उल्लेख आढळतो.
लोणार हे उल्कापातापासून तयार झालेलं सरोवर आहे. चंद्रावरील मातीचं या खाऱ्या पाण्याच्या गुणधर्माशी जवळचं नातं असल्याचं, जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या संशोधनातून सिद्ध झालं आहे. या सरोवराचा विविध अंगांनी अभ्यास करण्यासाठी जगाच्या कोनाकोपऱ्यातून इथे संशोधक नेहमी येतात. लोणार सरोवर परिसरात सातत्याने भूगर्भीय, पुरातत्त्व, पर्यावरण आणि आंतराळिकदृष्ट्या संशोधन केले जाते. लोणार सरोवर परिसरात अनेक प्रकारचे दुर्मीळ खडक, खनिज, काचमनी, पाण्यावर तरंगणारे दगड सापडतात. लोणार सरोवराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पाण्यातील क्षारांचे प्रमाण, आम्लारी गुणधर्म म्हणजेच सरोवराच्या पाण्याची पीएच लेव्हल इतकी जास्त असूनही याच्या बाजूला घेतलेल्या छोट्याशा खड्ड्यात मात्र गोड पाणी मिळते. या पाण्यात कुठलाही जीव जिवंत राहू शकत नाही परंतु यात विविध प्रकारचे जिवाणू, विषाणू, हरितनील शेवाळ आहेत NASA च्या वैज्ञानिकांनाही याचे रहस्य उलगडता आलेले नाही. येथे एक सासू सूनेची विहीर म्हणून ही ओळखली जाणारी पुरातन विहीर देखील आहे. या विहिरीचं अर्धं पाणी गोडं आणि अर्धं पाणी खारं असतं. संपूर्ण तलावात मिठासारखं खारं पाणी मात्र या विहीरीत अर्धं पाणी गोड असल्यानं हा एक निसर्गाचा चमत्कार समजला जातो.
वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात. यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| England beat Australia by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.