MHADA Scam Fraud: म्हाडाच्या नागपूर मंडळातील विक्रीवाचून रिक्त राहिलेल्या घरांची विक्री करण्यासाठी मंडळाकडून एका कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र या कंपनीने अर्जदार आणि म्हाडाची आर्थिक फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. या कंपनीविरोधात बर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. ही कंपनी कोकण मंडळातील घरांच्या विक्रीसाठीही नियुक्त असल्याचे समोर आल्याने कोकण मंडळासाठीची नियुक्तीही रद्द करण्यात आल्याची माहिती म्हाडा प्राधिकरणातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
अर्जदारांकडून घरांची 25 टक्के रक्कम घेतल्यानंतर ती नागपूर मंडळाच्या खात्यात जमा करणे त्यात ही रक्कम जमा करून व्याज बंधनकारक होते. असे असताना या कंपनीने एक नवीन खाते उघडून मिळवल्याचे स्पष्ट झाले. दुसरीकडे फसवणूक केल्याचेही समोर आले. 43 लाखांचे घर 50 लाखांचे असल्याचे सांगत अर्जदारांची फसवणूक केली आहे.
घरे विकण्यासाठी अनेक पर्याय म्हाडा प्राधिकरणाने आणले. त्यात खासगी कंपनीची नियुक्ती करून त्यांच्या माध्यमातून घरे विकण्याचा पर्याय होता. या पर्यायानुसार नागपूर मंडळाने नियुक्त केलेल्या कंपनीमध्ये ज्या कंपनीचा समावेश होता, त्यात आपली फसवणूक केली जात असल्याच्या तक्रारी 2024 पासून येत होत्या. मात्र कंपनीविरोधात कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. त्यानंतर 2025 साठी पुन्हा कंपनीच्या नियुक्तीसाठी निविदा काढण्यात आली असता त्यात या कंपनीनेही निविदा भरली आणि या कंपनीची नियुक्तीही झाली. दरम्यान, या कंपनीविरोधात तोपर्यंत 16 तक्रारी दाखल झाल्या होत्या. काही महिन्यांपूर्वी नागपूर मंडळाचे मुख्य अधिकारी म्हणून पदभार स्वीकारलेल्या विजय इंगोले यांनी तपास केला असता कंपनीने अर्जदारांची आणि नागपूर मंडाळाची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले.
नक्की वाचा >> म्हाडाकडून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य.. ना लॉटरी, ना टेन्शन; दादर, पवईत घरांची थेट विक्री: पाहा तपशील
नागपूर मंडळाने आता रिक्त घरांच्या विक्रीची सर्व प्रक्रिया संगणकीय केली आहे. तसेच ज्या तक्रारदारांचे पैसे कंपनीने घेतले होते, त्या तक्रारदारांना घरांचा ताबा देण्यात आला असून कंपनीकडून एक कोटी रुपये वसूल केले आहेत.
मुंबईमधील दादर, पवई आणि ताडदेव येथील म्हाडाच्या महागडी घरंही विक्री वाचून पडून आहेत. विक्रीवाचून रिक्त राहिलेल्या या घरांच्या विक्रीसाठी म्हाडाने थेट प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य धोरण स्वीकारत विक्री करण्याचा निर्णय घेतला असून मंजुरीनंतर लगेच त्याची जाहीर दिली जाणार आहे.
स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.