Crime News : हॉटेलमध्ये तीन तरुणी, आळीपाळीने लोक यायचे अन् मग...नागपुरातील निवासी परिसरातील धक्कादायक घटना

Nagpur Crime News : नागपुरात पोलिसांनी ऑपरेशन शक्ती मोहीमेतर्गंत रेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. त्यानंतर शहरात एकच खळबळ माजली आहे. 

नेहा चौधरी | Updated: Oct 11, 2025, 05:54 PM IST
Crime News : हॉटेलमध्ये तीन तरुणी, आळीपाळीने लोक यायचे अन् मग...नागपुरातील निवासी परिसरातील धक्कादायक घटना

Nagpur Crime News : नागपुरात पोलिसांनी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करत तीन मुलींना सुरक्षित वाचवले आहेत. शहरातील एका शांत निवासी भागातील प्रमिला प्रकाश हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकला. त्यानंतर हा धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी ऑपरेशन शक्ती मोहीमेतर्गंत ही कारवाई करत तीन मुलींना सुरक्षितपणे वाचविण्यात आलं आहे.  (Nagpur sex racket in a residential area 3 girls and arresting 2 suspects Crime News in marathi)

Add Zee News as a Preferred Source

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या सेक्स रॅकेटमध्ये मुलींना पैशाचे आमिष दाखवून फसवण्यात आले होते. या रॅकेटचा मास्टरमॅन तरुणींना कमी वेळेत जास्त पैसे कमावण्याचे आमिष दाखवत होता. त्यानंतर या मुलींकडून तो देहविक्री करुन घेत होता. पोलिसांनी या सेक्स रॅकेटमध्ये दोन मुख्य आरोपींनी गजाआड केलं आहे. या आरोपींचं नाव कांचन नीमजे आणि दीपक हेमंत कुमार शुक्ला असं आहे. या आरोपींना पोलिसांनी हॉटेलमधून अटक केली आहे. 

...असा केला सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना त्या हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट सुरु असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून या प्रकरणाचा भांडाफोड केला. बनावट ग्राहक हॉटेलमध्ये गेल्यावर त्याने तिथल्या लोकांशी संवाद साधायला सुरुवात केली. त्यावेळी या हॉटेलमधील कांचन नीमजे आणि दीपक हेमंत कुमार शुक्ला या दोघांनी चालवलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला. त्यानंतर बनावट ग्राहकांनी पोलिसांनी त्याची माहिती दिल्यानंतर त्यांनी हॉटेलवर छापा मारला. 

नागपूर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने माहिती दिली की, ऑपरेशन शक्ती मोहीमेतर्गंत ही कारवाई करण्यात आली असून गेल्या काही महिन्यांपासून शहरात मानव तस्करी आणि सेक्स रॅकेटविरोधात कठोर कारवाई करण्यात येत आहे. या छाप्यात हॉटेलचे सीसीटीव्ही कॅमेरे, डीव्हीआर आणि इतर पुरावेही पोलिसांनी जप्त करण्यात आले आहेत. ज्यामुळे संपूर्ण रॅकेटचे नेटवर्क उघडकीस आले आहेत.

पोलिसांनी पुढे सांगितलं की, या छाप्यातून हेही समोर आलंय की, रॅकेट संचालक सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातील मुलींना सहजपणे फसवतात. तसंच त्यांच्यावर दबाव टाकतात. 

FAQ

प्रश्न 1: ही घटना कुठे आणि कशाबाबत आहे?
उत्तर: नागपूर शहरातील एका शांत निवासी भागात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. पोलिसांनी प्रमीला प्रकाश हॉटेलवर छापा टाकून तीन मुलींना सुरक्षितपणे वाचवले आणि दोन आरोपींना अटक केली. ही कारवाई 'ऑपरेशन शक्ती' मोहिमेअंतर्गत करण्यात आली.
प्रश्न 2: सेक्स रॅकेटचे संचालक कोण होते आणि त्यांचे कृत्य काय होते?
उत्तर: रॅकेटचे मुख्य संचालक कांचन नीमजे आणि दीपक हेमंत कुमार शुक्ला हे आहेत. ते तरुणींना कमी वेळेत जास्त पैसे कमावण्याचे आमिष दाखवून फसवत होते आणि त्यांच्याकडून देहविक्री करवून घेत होते. पोलिसांनी त्यांना घटनास्थळीच अटक केली.
प्रश्न 3: रॅकेट कसा उघडकीस आला?
उत्तर: पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून हॉटेलमध्ये तपास केला. बनावट ग्राहकाने हॉटेलमध्ये संभाषण केल्यानंतर रॅकेटचे सर्व कृत्य समोर आले. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकला आणि तीन मुलींना बाहेर काढले.

About the Author

Neha Choudhary

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला,  26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे. 

...Read More