Nagpur Teacher Recruitment Scam: नागपुरातल्या शिक्षक भरती घोटाळ्याची मुख्यमंत्री फडणवीस यांनी दखल घेतली आहे. झी 24 तासनं ही बातमी दाखवली होती. नागपुरात बनावट कागदपत्रांच्या आधारे मुख्यध्यापकपदी नियुक्ती केली होती.. या प्रकरणी 580 अपात्र शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द होण्याची शक्यता आहे. बोगस शिक्षक भरती प्रकरणात नागपूरमध्ये पोलिसांकडून चौकशी सुरूय. पोलिसांकडून विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात झाडाझडती सुरूय..उपसंचालक उल्हास नरड यांच्या कार्यालयाचीही चौकशी करण्यात आली.
या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचा-यांच्या नियुक्त्यांची चौकशी सुरु आहे. या प्रकरणी शिक्षण उपसंचालक उल्हास नरडसह एकूण पाच जणांची पोलीस कोठडी आज संपणार आहे. त्य़ांना न्यायालयात हजर केलं जाणार आहे. या प्रकरणात अटकेत असलेल्या निलेश मेश्रामनं कागदपत्र बनवण्यासाठी 10 लाख रुपये घेतले होते. तोच या प्रकरणात मुख्य आरोपी असल्याचं बोललं जात आहे.
महाराष्ट्रातील शिक्षण संस्थांमधील बोगस शिक्षक भरतीच्या घोटाळ्याचा झी 24 तासनं भांडाफोड केला होता. दरम्यान यानंतर आता कारवाईचा बडगा उगारण्यात येतोय. झी 24 तासन दाखवलेल्या बातमीनंतर मालेगावमधील महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालेगावच्या महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण संस्थेत कनिष्ठ लिपिक पदावर पात्रता नसताना संदीप विश्वनाथ जाधवांची बेकायदेशीर नियुक्ती करण्यात आली होती. 2012 मध्ये या प्रकरणात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. दरम्यान या प्रकरणी कोर्टानं निकाल दिला असून संस्थेचे संचालक, मुख्याध्यापक, कनिष्ठ लिपिक संदीप जाधवांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संस्था चालकांनी शासनाची 45 लाखांना फसवणूक केली. बोसग शिक्षक भरतीचा प्रकार केवळ मालेगावातच नव्हे तर धुळे, नंदुरबार आणि जळगावधून देखील समोर आलाय. बोसग शिक्षक घोटाळा प्रकरणात जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 46 शिक्षकांना निलंबित करण्यात आलंय. तर तिकडे नागपुरात देखील 500 बोगस शिक्षक आढळून आले आहेत..