महाराष्ट्रातील भयानक घटना! तरुणीने वडिलांचे गुप्तांग कापले; असं घडलं तरी काय?

नालासोपारा येथे एक अत्यंत भयानक घटना घडली आहे. एका तरुणीने  वडिलांचे गुप्तांग कापले आहे. 

वनिता कांबळे | Updated: Mar 24, 2025, 11:57 PM IST
महाराष्ट्रातील भयानक घटना! तरुणीने वडिलांचे गुप्तांग कापले; असं घडलं तरी काय?

Nalasopara Crime News : महाराष्ट्रात एक अत्यंत भयानक घटना घडली आहे.   मुलीने वडिलांचे गुप्तांग कापले आहे. सावत्र पित्याकडून लैंगिक अत्याचार होत होता. यामुळे मुलीने रागाच्या भरात हे कृत्य केले.  नालासोपारा येथे ही घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.  

नालासोपाऱ्यात सावत्र बापाकडून होणार्‍या लैंगिक अत्याचारा कंटाळून एका तरुणीने वडिलांवर चाकूने हल्ला केला. सोमवारी दुपारी 12 च्या सुमारास नालासोपारा पूर्वेच्या संतोषभुवन येथे ही घटना घडली आहे. या हल्ल्यात मुलीचे वडील गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे

तुळींज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोर तरुणी 24 वर्षांची आहे. तिच्या आईने दुसरे लग्न केले होते. तिचे सावत्र वडील विजय भारती हे मागील दोन वर्षांपासून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होते. सोमवारी देखील त्यांनी तिच्यावर शरीरसंबंध बनविण्यासाठी दबाव टाकला होता. त्यामुळे तिने संतापून चाकूने हल्ला केला आणि त्यांचे गुप्तांग कापून टाकले.

या हल्ल्यानंतर विजय भारती याने बचावासाठी घराबाहेर धाव घेतली तिने रस्त्यात गाठून त्यांच्यावर वार केले. हातात चाकू घेऊन फिरत असलेला या तरुणीची व्हिडियो देखील स्थानिकांना काढला आहे. सध्या तुळींज पोलिसांनी तिला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.