प्रथमेश तावडे, झी 24 तास, नालासोपारा: आधीच कोरोना आणि त्यात महागाईचा तडका यामुळे नागरिकांचे हाल झाले आहेत. घरात एकट्या राहणाऱ्या आजीला महावितणने मोठा धक्काच दिला आहे. 70 वर्षीय आजीला एक घराचं बिल पाहून पोटात गोळाच आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नालासोपारा पश्चिमेच्या एका जुन्या इमारती मध्ये राहणाऱ्या 70 वर्षीय आजीला महावितरणाकडून तब्बल एक लाखाचे बिल पाठविल्याच्या धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 


क्रसेल मारिया असं या आजीचे नाव असून ती घरात एकटी राहते. दर महिन्याला या आजीला पंखे व लाईट चे असे दोनशे ते अडीजचे बिल येत होते.  मात्र या महिन्याचे तिला तब्बल 97,520 रुपये आल्याचे कळाले तेव्हा ती थोडक्यात हार्ट अॅटॅकच्या धक्क्यातून बचावली. 



महावितरणाच्या या भोंगळ कारभारामुळे आजीची तब्येत खालावली आहे. घरात टीव्ही फ्रिज नसताना देखील डोळे बंद करून भरमसाठ बिल पाठविणाऱ्या महावितरणाच्या कारभाराविरोधात रहिवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे.