शेतकऱ्याच्या लेकीला व्हायचंय तहसीलदार पण अतिवृष्टीमुळे चिंतेत; श्रद्धा भंडारेच्या स्वप्नासाठी 'येथे' पाठवा मदत!

Shraddha Bhandare:  फक्त लढ म्हणा या खास उपक्रमातून श्रद्धाचा शिक्षणासाठीचा संघर्ष पाहुयात.

प्रविण दाभोळकर | Updated: Oct 18, 2025, 04:35 PM IST
शेतकऱ्याच्या लेकीला व्हायचंय तहसीलदार पण अतिवृष्टीमुळे चिंतेत; श्रद्धा भंडारेच्या स्वप्नासाठी 'येथे' पाठवा मदत!
श्रद्धा भंडारे

Shraddha Bhandare: नांदेडमधील श्रद्धा भंडारेला तहसीलदार व्हायचं आहे. पण यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे तिचं स्वप्न पूर्ण होणार की नाही याची काळजी तिला सतावतेय. कारण शिक्षणासाठी कुटुंबीयांकडून पैसेच येणार नाहीत. त्यामुळे पुढील शिक्षण कसं घ्यायचं याची चिंता तिला सतावतेय. फक्त लढ म्हणा या खास उपक्रमातून श्रद्धाचा शिक्षणासाठीचा संघर्ष पाहुयात.

Add Zee News as a Preferred Source

मराठवाड्यात यंदा पावसानं कहर केलाय. त्यामुळे शेतकरी उद्धवस्त झालाय.श्रद्धा भंडारे यांच्या शेतातही पाणी शिरलं.. त्याचं दोन एकरावरील सोयाबीन पाण्यात वाहून गेलाय. जमीनही खरडून गेलीय. शेतीतून मिळणार उत्पन्न यंदा मिळणार नाही. त्यामुळे 10 वीत शिकणा-या श्रद्धा भंडारेला पुढील शिक्षण पूर्ण होणार की नाही याची काळजी लागलीय... श्रद्धाचं तहसीलदार होण्याचं स्वप्न आहे..  त्यामुळे ते स्वप्न पूर्ण होणार की नाही या विवंचनेत सध्या ती आहे.  

श्रद्धा प्रल्हाद भंडारे
बँक खांत क्रमांक- 42161990909
Ifsc code - SBIN0003498
बँक- स्टेट बँक ऑफ इंडिया
शाखा- नायगाव, नांदेड
GPAY-9096424454

शेतक-याच्या लेकीचं शिक्षण अपूर्ण राहू नये यासाठी तुम्हीही तिला तिच्या बँक खात्यात थेट मदत करू शकता.जगाचा पोशिंदा असलेल्या शेतक-याच्या लेकीचं स्वप्न आर्थिक संकटामुळे अपूर्ण राहू नये.. यासाठी तिला भरघोस आर्थिक मदत करा.

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More