)
Nashik Crime News : वाढत्या गुन्हेगारीमुळे पुणे शहरात दहशत पसरली आहे. मात्र, महाराष्ट्रातील एका छोटाशा शहरात पुण्यापेक्षा भयानक स्थित आहे. नाशिक शहर बनले गुन्हेगारांचे नंदनवन बनले आहे. 9 महिन्यात नाशिकमध्ये 43 खून, पाच गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. नाळिक शहरातील नागरिर दहशतीत आहेत. पोलिसांचा आरोपींवर धाक नसल्याने गुन्हेगारी वाढत असल्याचा संताप नागरिकांनी व्यक्त केला आहे.
नाशिक शहरात पाथर्डी भागात कॅफेमध्ये एका तरुणाची हत्या करण्यासाठी एकाच बाईकवर चार जण आले होते. त्यात तिघांकडे कोयते. याचे थरारक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले. अवघ्या दहा मिनिटात कॅफेमध्ये थेट शिरच्छेद करण्यात आला. असे एक दोन नव्हे तर गेल्या सप्तेबर महिन्यात आठवड्याला दोन हत्या करण्यात आल्या आहेत. सर्वाधिक उद्रेक औद्योगिक वसाहती असलेल्या अंबड आणि सातपूर भागात पाहायला मिळतोय.
या वर्षभरात गुन्हेगारांचे गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. खून करण्यासाठी कुणाचीही भीती नसल्यागत खुलेआम कोयते घेऊन फिरत आहेत. इंस्टाग्राम वर थेट लाइव्ह करत तर काही आपला बडेजाव मिरवीत धमक्या देत आहेत . पोलिस नंतर कारवाई करत असले तरी त्यांच्यात वाढत असलेला भाईगिरीचा आत्मविश्वास नाशिकच्या कायदा सुव्यवस्थेसाठी घातक ठरतो आहे
आता पोलिसांवर या सर्वांवर तातडीने नियंत्रण करण्याचे आव्हान आहे. येत्या दोन वर्षात कुंभमेळा आहे त्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यस्थ चोख असणे आवश्यक आहे अन्यथा येत्या काळात विविध गुन्हेगारांच्या गँगचा धुमाकूळ शहरासाठी डोकेदुखी ठरणार आहे
दरराेज सरासरी एक घरफाेडी व राेज दाेन चाेरीच्या घटना
- पंचवटीतील गोळीबाराचा घटनाक्रम
सन-२०१७ मध्ये निकम गँगच्या गोळीबारात संदीप लाड जखमी
सन २०२३-२४ पूर्वी निकम गँगच्या गोळीबारात विद्यार्थ्यांचा नाहक बळी
मार्च २०२३ मध्ये मायको दवाखान्याजवळील कालिकानगरात टोळीयुद्धातून गोळीबार
सन २०२४ मध्ये पेठरोड येथे अवैध सावकारीतून व्यक्तीवर गोळीबार
ऑक्टोबर २०२४ मध्ये मालेगाव स्टॅण्ड पोलीस चौकीजवळ सराईतांचा हवेत गोळीबार
डिसेंबर २०२४ मध्ये आरटीओजवळ सोनवणे गँगचा पोलीस पथकावर गोळीबार
फेब्रुवारी २०२५ मध्ये गणेशवाडी पोस्ट ऑफिससमोर दोन गटांचा गोळीबार
फेब्रुवारी २०२५ मध्ये म्हसरूळ हद्दीतील कलानगरात बिल्डरच्या घरावर गोळीबार
जुलै २०२५ मध्ये फुलेनगरात
तर तीन दिवसापूर्वी लेव्हल बार मध्ये खंडणीसाठी गोळीबार करण्यात आला टोळीयुद्धातून एकमेकांवर शहरात तीन वर्षांत गाेळीबाराच्या 16 घटना घडल्या आहेत.