Nashik Crime: गेल्या तीन वर्षांपूर्वी विम्याचा लाभ घेण्यासाठी विमाधारकाच्या खुना सह एका भिकाऱ्याचा खून केल्याची घटना घडली होती. यात भिकाऱ्याचा खून करणाऱ्या संशयिताला पोलिसांनी अटक केली. कशाप्रकारे विमा मिळवत दुहेरी खून करण्यात आला? याबद्दल सविस्तर जामून घेऊया.
गेल्या तीन वर्षांपूर्वी नाशकात एक धक्कादायक घटना घडली होती. यात चार कोटी रुपयाचा विमा मिळवण्यासाठी तब्बल दोन जणांचा खून करून चार कोटी रुपयांचा विमा मिळाला होता. यात विशेष बाब म्हणजे ज्या धारकाचा विमा काढण्यात आला होता त्याचाच खून करून संशय त्यांनी हा विमा मिळवला होता. याप्रकरणी पोलिसांनी सहा संशयितांना अटक केली होती. मात्र भिकाऱ्याचा खून करून फरार झालेला संशयित गेल्या तीन वर्षापासून पोलिसांच्या हाती लागला नव्हता. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार या संशयीताला पोलिसांनी म्हसरुळ परिसरात अटक केली.
चेहऱ्याची मिळता जुळता चेहरा पाहून एका भिकाऱ्याचा खून केल्याची घटना घडली होती. यात 3 वर्षापूर्वी विम्याचा लाभघेण्यासाठी एका विमाधारकाच्या चेहऱ्याशी जुळणाऱ्या भिकाऱ्याला पाच जणांनी म्हसरुळ शिवारात ठार मारले होते. या गुन्ह्यात फरार असलेला संशयित आरोपी योगेश राजेंद्र साळवी यास अखेर पंचवटीत गुन्हे शाखा युनिट-1 च्या पथकाने बेड्या ठोकल्या. याप्रकरणी त्यांच्या फिर्यादीवरून म्हसरुळ पोलिस ठाण्यात संशयित आरोपी मंगेश सावकार, रजनी उके, दीपक भारुडकर, प्रणव साळवी, योगेश साळवी यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात योगेश हा मागील तीन वर्षापासून पोलिसांना हवा होता.
आरोपी योगेश याने भोंदूबाबाचे वेशांतर करत नर्मदा परिक्रमा, प्रयागराजच्या कुंभमेळ्यातसुद्धा मिरविल्याचे समोर आले आहे. पोलिसांना कळाली. पथकाने मालेगाव स्टॅण्ड भागात सापळा रचला. तेथे रविवारी सायंकाळी सात वाजता योगेश येताच त्यास हेरून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. विमाधारकाच्या विम्याची रक्कम मिळविण्यासाठी त्या विमाधारकाच्या चेहऱ्याशी जुळणारा चेहरा शोधून म्हसरुळला या टोळीने भिकाऱ्याचा खून केला होता. त्याची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. त्याचा अपघाती मृत्यू झाल्याचे दाखवून तोच व्यक्ती हा विमाधारक आहे, असा बनाव करण्याचा डाव या टोळीचा होता. मात्र तो यशस्वी झाला नाही. या संशयितांच्या टोळीने नंतर 3 विमाधारक अशोक भालेराव यांच्या खुनाचा कट रचला. संगनमताने त्यांनी अशाच पद्धतीने इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळ रात्री भालेराव यांचा काटा काढून अपघाती मृत्यूचा बनाव रचला होता, असे पोलिसांनी सांगितले. ही टोळी भालेराव यांच्या खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात आहे.
सिनेस्टाईल घडलेल्या या संपूर्ण घटनेची चर्चा संपूर्ण राज्यभर पसरली होती तब्बल चार कोटींचा विमा मिळवण्यासाठी या टोळीने संपूर्ण प्लॅन आखला होता हा प्लॅन फिस्कटल्यामुळे विमाधारकाचाच खून केला होता पैशाची वाटाघाटी ही झाली नाही या कारणामुळे हा संपूर्ण प्रकार समोर आला.
"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."
...Read More|
RCB
(20 ov) 201/8
|
VS |
RR
202/4(18 ov)
|
| Rajasthan Royals beat Royal Challengers Bengaluru by 6 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
OMA
(50 ov) 218/9
|
VS |
NAM
223/9(49.3 ov)
|
| Namibia beat Oman by 1 wicket | ||
| Full Scorecard → | ||
|
KKR
(20 ov) 181/4
|
VS |
LSG
182/7(20 ov)
|
| Lucknow Super Giants beat Kolkata Knight Riders by 3 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.