हळदीच्या कार्यक्रमात पिवळ्या रंगाचे हात अचानक लाल झाले! नाशिकमध्ये घडली भयानक घटना

नाशिकमध्ये हळदीच्या कार्यक्रमात धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणावर चाकूने वार करण्यात आले. 

वनिता कांबळे | Updated: Apr 21, 2025, 03:40 PM IST
हळदीच्या कार्यक्रमात पिवळ्या रंगाचे हात अचानक लाल झाले! नाशिकमध्ये घडली भयानक घटना

Nashik Crime News : नाशिकमध्ये एक अत्यंत थरारक घटचना घडली आहे. हळदीच्या कार्यक्रमात एका तरुणाचा खून झाला. यामुळे एकच खळबळ उडाली. पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी पोलिस हल्लेखोराचा शोध घेत आहेत. 

नाशिकच्या पिंपळगाव बसवंत येथे ही घटना घडली आहे. येथे हळदीचा कार्यक्रम सुरु होता. या कार्यक्रमात तरुणाचा खून झाला आहे.  किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून हळदीच्या कार्यक्रमातच एका तरुणाचा धारदार शस्त्राने वार करुन खून करण्यात आला आहे.  रवी सोमनाथ गुबांडे (वय २३) असे मृत तरुणाचे नाव आहे. हत्या केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरुन फरार झाला. 

अंबरनाथमध्ये बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर गोळीबार

अंबरनाथमध्ये बांधकाम व्यावसायिक विश्वनाथ पनवेलकर यांच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.।आज दुपारी अडीच वाजताच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी पनवेलकर यांच्या घरावर दोन गोळ्या झाडून पळ काढला.

अंबरनाथच्या हुतात्मा चौकाजवळ उद्योजक विश्वनाथ पनवेलकर यांचं सीताई सदन हे घर आहे. आज दुपारी अडीच वाजताच्या सुमारास पनवेलकर यांच्या घराबाहेर दुचाकीवरून दोन अज्ञात हल्लेखोर आले आणि त्यांनी पनवेलकर यांच्या घराच्या गेटच्या दिशेने दोन गोळ्या झाडत तिथून पळ काढला. ही संपूर्ण घटना पनवेलकर यांच्या घराबाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. याप्रकरणी आता शिवाजीनगर पोलीस, तसंच क्राईम ब्रँचची टीम घटनास्थळी दाखल झाली असून पोलिसांकडून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.

बीडच्या माजलगाव मध्ये एका हॉटेल मालकाची हत्या 

बीडच्या माजलगाव मध्ये एका हॉटेल मालकाची हत्या कण्यात आलीये. बिलाच्या वादातून हॉटेल चालक आणि त्याच्या मुलावर प्राण घातक हल्ला करण्यात आला.. यात हॉटेल चालकाचा मृत्यू झाला असून त्याचा मुलगा गंभीर जखमी झालाय. या घटनेमुळे बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय.. दरम्यान आरोपींना तात्काळ अटक करा अशी मागणी नातेवाईकांनी केलीये