Nashik Pune Semi High Speed Rail Project : महाराष्ट्रातील पहिला सेमी हायस्पीड ट्रेन प्रकल्प लवकरच मार्गी लागणार आहे. पुणे नाशिक दरम्यान महाराष्ट्रातील पहिली सेमी हायस्पीड ट्रेन धावणार आहे. यामुळे पुणे नाशिक दरम्यानचा जळपास तब्बल साडे पाच तासांचा प्रवास 120 मिनिटांत म्हणजेच फक्त दोन तासात पूर्ण होणार आहे. या सेमी हायस्पीड ट्रेनमुळे पुणे नाशिक दरम्यान नवी कनेक्टिव्हीटी मिळणार आहे. या सेमी हायस्पीड ट्रेन प्रकल्पाचा नवीन डीपीआर तयार आहे.
या नव्या सेमी हायस्पीड ट्रेनमुळे पुणे, नाशिकसह आणि अहमदनगरकरांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या पुणे नाशिक प्रवासासाठी बाय रोड हा एकच पर्याय आहे. नव्या सेमी हायस्पीड ट्रेनमुळे या मार्गावर रेल्वेची कनेक्टिव्हीटी मिळणार आहे. नव्या सेमी हायस्पीड ट्रेनमुळे पुणे नाशिक हे जवळपास 249 अंतर अवघ्या पावणे दोन तासांत पार करता येणार आहे.
खासदार राजाभाऊ वाजे यांनी या प्रकल्पासांदर्भात केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा नवीन तपशीलवार प्रकल्प अहवाल (डीपीआर) अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होईल.
दरम्यान, महारेलच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या या प्रोजेक्टच्या डीपीआरमध्ये नारायणगाव येथील 'जीएमआरटी'चा सुरक्षा संवेदनशील प्रकल्प तसेच नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्सद्वारे संचालित जायंट मेट्रोवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (रेडिओ टेलिस्कोप) वापरण्याचा रेल्वेला प्रस्ताव होता. मात्र, ही बाब रेल्वे मंत्रालयाच्या लक्षात येताच नवीन आराखडा (डीपीआर) तयार करण्याच्या निर्णय घेण्यात आला.
नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे मार्ग हा 235 किलोमीटरचा असणार आहे. या मार्गावर नाशिक-पुणे दरम्यान 20 रेल्वे स्टेशन उभारले जाणार आहेत. या प्रकल्पासाठी 102 पैकी 85 गावांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या प्रकल्पातून 25 हजार नोक-या निर्माण होतील असा अंदाज आहे.आता प्रकल्पाचे काम प्रत्यक्षात कधी सुरु होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काम सुरु झाल्यावर हा प्रकल्प पाच वर्षात पूर्ण करण्याचा महारेलचा मानस आहे.
वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात. यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.