Nasrapur Rape Case Accused Bhimrao Kambli On Crime Scene: पुणे पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला नसरापूरमधील त्याच गोठ्यात घेऊन जाण्यात आलं जिथे त्याने या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या केली. यावेळी तो चौकशीदरम्यान पोलिसांना काय म्हणाला?

Nasrapur Rape Case Accused Bhimrao Kambli On Crime Scene: पुण्यामधील भोर तालुक्यातील नसरापूर येथे महाराष्ट्र दिनी झालेल्या क्रूर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला आज पुणे पोलीस घटनास्थळी घेऊन गेले होते. नसरापूरमधील एका गोठ्यामध्ये या 65 वर्षीय भीमराव कांबळेने चार वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केले आणि त्यानंतर तिची हत्या करुन मृतदेह शेणाच्या ढीगाऱ्याखाली गाडून ठेवला होता. या प्रकरणाचा खुलासा सायंकाळी झाला तेव्हा एकच खळबळ उडाली. जवळच लावलेल्या सीसीटीव्हीमधील फुटेजवरुन भीमराव कांबळेनेच हे कृत्य केल्याचं समोर आलं. त्यानंतर एकच खळबळ उडाली. मात्र त्या दिवशी घटनास्थळी, त्या गोठ्यात नेमकं काय घडलं हे जाणून घेण्यासाठी आज पुणे पोलीस आरोपीला घटना घडलेल्या ठिकाणी घेऊन गेले होते. मात्र आरोपीने त्या ठिकाणी केवळ एकाच वाक्यात पोलिसांनी उत्तर दिल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणामध्ये समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दुपारी तीन वाजून 12 मिनिटांनी आरोपी पीडित मुलीला गोठ्यात घेऊन जाताना दिसत आहे. 'तुला गायीचं वासरु दाखवतो' असं आमिष दाखवून आरोपी या चिमुकलीला गोठ्यात घेऊन गेला. पीडितेला गायी आणि वासरांचा प्रचंड लळा होता म्हणूनच ती या व्यक्तीसोबत गेल्याचं पीडितेच्या वडिलांनी जबाबामध्ये सांगितलं आहे.
नक्की वाचा >>
आरोपीने पीडितेला गोठ्यात नेल्यानंतर तिच्या तोंडात सॉक्स कोंबून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. अमानुष अत्याचार करतानाच चिमुकलीला अनेक जखमा झाल्या आणि त्यातच ती दगावल्याचं सांगितलं जात आहे. डॉक्टरांनी दिलेल्या प्राथमिक अहवालामध्ये आरोपीने पीडितेने प्राण सोडले आहेत की नाही ते तपासण्यासाठी तिच्यावर अत्याचार करुन झाल्यानंतर छातीत जोरदार बुक्का मारल्याचं नमूद केलं आहे. यावरुनच आरोपीने किती क्रूर पद्धतीने हा सारा प्रकार केला याचा अंदाज बांधता येतोय.
#Maharashtra #Pune- A deeply disturbing incident has been reported from #Nasrapur village in #Bhor taluka of Pune, where a four-year-old girl was allegedly r*ped and brutally murdered. The accused, a 65-year-old man, resident of same village, has been taken into custody.
— Siraj Noorani (@sirajnoorani) May 2, 2026
1/3 pic.twitter.com/WDvJdW13KG
आरोपीकडून घटनास्थळी नेमकं काय घडलं हे जाणून घेण्यासाठी पोलीस आज पहाटे त्याला त्याच गोठ्यात घेऊन गेले होते. ज्या ठिकाणी भीमराव कांबळेने चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केले आणि तिची हत्या केली तिथेच पोलीस त्याला घेऊन गेले. पोलिसांनी आरोपीसमोरच या ठिकाणीची पहाणी केली आणि नेमकं काय घडलं याबद्दल विचारलं. मात्र आरोपीने पोलिसांचे सारे प्रश्न एका वाक्यात उडवून लावल्याची माहिती समोर येत आहे. "मी दारूच्या नशेत होतो. मला या घटनेसंदर्भात काही आठवत नाही," असा अजब दावा आरोपी भीमराव कांबळेने पोलिसांच्या प्रश्नांची उत्तर देण्यास टाळाटाळ करताना केला.
पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे चिमुरडीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करण्यात आल्याच्या घटनेचे तीव्रप्रसाद राज्यभरात उमटत असून नाशिकच्या येवल्यात अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ व परशुराम संघटनेच्या वतीने काळ्याफिती बांधून येवला तहसीलदार आबा महाजन यांना विविध मागण्यांची निवेदन देण्यात आले. शक्ती कायद्याची अंमलबजावणी करावी, आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशा घोषणांनी तहसील कार्यालयाचा परिसर दणाणून गेला. याप्रसंगी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ व परशुराम संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.