)
Ravindra Dhangekar Vs Navnath Ban: पुण्यातील शिवसेने नेते रवींद्र धंगेकर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेण्यासाठी मुंबईत दाखल झालेत. पुण्यातील जैन बोर्डिंगसह इतर विषयांवर दोघांमध्ये चर्चा झाली. धंगेकर दोन दिवस थांबा मी तोडगा काढतो असं आश्वासन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिलं होतं. त्यानंतर रवींद्र धंगेकरांनी आता थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. 'मी व्यक्तीविरोधात नसून प्रवृत्तीविरोधात असल्याचं धंगेकरांनी म्हटलंय. शेवटपर्यंत लढाई सुरुच राहणार असल्याचंही धंगेकरांनी म्हटलंय. भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांच्यानंतर धंगेकरांनी आता भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांना डिवचलंय. त्यामुळे दोघांमध्ये ट्वीटर युद्ध रंगलेलं पाहायला मिळतंय.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर आणि भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांच्यात ट्विटर वॉर रंगलंय. धंगेकर यांच्याकडून बन यांचा डोरेमॉन असा उल्लेख करण्यात आलाय. धंगेकर यांच्या टीकेला बन यांनीही जशास तसं उत्तर दिलंय. मी डोरेमॉन तर तुम्ही बावळट नोबिता आहात, असे बन म्हणाले आहेत.
बारा पक्ष फिरून शिवसेनेते आलेले ज्येष्ठ नेते रविंद्रजी धंगेकर यांनी मला ‘डोरेमॉन’ म्हटलं आहे.
— Navnath Kamal Uttamrao Ban (@NavnathBanBJP) October 28, 2025
पण ते विसरले की डोरेमॉन उपाय शोधतो. लोकांना मदत करतो. त्याच कार्टून सीरीजमध्ये ‘नोबिता’ नावाचं एक पात्र आहे.
तुमच्या म्हणण्यानुसार मी ‘डोरेमॉन’ आहे तर तुम्ही बावळट ‘नोबिता’ आहात.… https://t.co/YM3lpqWnBi pic.twitter.com/XevR3PF335
रविंद्र धंगेकरांनी डिवचल्यानंतर त्याला भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलंय. त्यांनी एक्स या सोशल मीडिया अकाऊंटवरुन धंगेकरांचा फोटो शेअर केलाय. तसेच त्यांचा उल्लेख नोबिता असा केलाय. बारा पक्ष फिरून शिवसेनेते आलेले ज्येष्ठ नेते रविंद्रजी धंगेकर यांनी मला ‘डोरेमॉन’ म्हटलं आहे. पण ते विसरले की डोरेमॉन उपाय शोधतो. लोकांना मदत करतो. त्याच कार्टून सीरीजमध्ये ‘नोबिता’ नावाचं एक पात्र आहे. तुमच्या म्हणण्यानुसार मी ‘डोरेमॉन’ आहे तर तुम्ही बावळट ‘नोबिता’ आहात. नोबिता हे कार्टून बावळट आहे. डोरेमॉन हे कॅरेक्टर लोकांना मदत करतं. मी त्यांना डॉबरमॅन म्हणणार होतो पण तशी आमची संस्कृती नाही, असे बन म्हणाले.
शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांना सोशल मीडियावर 'डोरेमॉन' म्हणून संबोधले. यानंतर दोघांमध्ये ट्विटरवरून राजकीय टोलेबाजी सुरू झाली, ज्यात बन यांनी धंगेकरांना 'बावळट नोबिता' म्हटले.
पुण्यातील जैन बोर्डिंगसह इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी धंगेकर मुंबईत गेले. शिंदे यांनी 'दोन दिवस थांबा, मी तोडगा काढतो' असे आश्वासन दिले. धंगेकर म्हणाले की, ते व्यक्तीविरोधात नसून प्रवृत्तीविरोधात आहेत आणि लढाई शेवटपर्यंत चालू राहील.
3) नवनाथ बन यांनी धंगेकरांच्या टीकेला कसं उत्तर दिलं?
धंगेकरांनी बन यांना 'डोरेमॉन' म्हटल्यानंतर बन यांनी प्रत्युत्तर दिले: '१२ पक्ष फिरून शिवसेनेत आलेले धंगेकर, डोरेमॉन उपाय शोधतो आणि मदत करतो. तर तुम्ही बावळट नोबिता आहात. मी डॉबरमॅन म्हणणार होतो, पण आमची संस्कृती तशी नाही.'