आरएसएसमध्ये प्रवेश कधी केला ? मी घरी जाऊन बायकोला विचारणार- जयंत पाटील

आरएसएसच्या त्या व्हायरल होणाऱ्या फोटोत माझी पत्नी दिसत असल्याचे जयंत पाटील म्हणाले.

Updated: Aug 12, 2019, 07:57 PM IST
आरएसएसमध्ये प्रवेश कधी केला ? मी घरी जाऊन बायकोला विचारणार- जयंत पाटील

मुंबई : आरएसएसचे नाव असलेली एक कथित पोस्ट सध्या सोशल मीडियात फिरत आहे. या पोस्टमधील फोटोत काही स्त्रीया स्वयंपाक बनवत आहेत. पूर ग्रस्तांसाठी स्वयंपाक बनवताना संघ स्वयंसेवक असे या फोटोवर लिहिले आहे. या पोस्टवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निशाणा साधला आहे. आरएसएसच्या त्या व्हायरल होणाऱ्या फोटोत माझी पत्नी दिसत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच माझ्या पत्नीने आरएसएस कधी जॉईन केले हे मी घरी जाऊन विचारणार असल्याचे ते म्हणाले. कोल्हापुरातील पत्रकार बैठकीतील जयंत पाटील बोलत होते. 

आरएसएसच्या पोस्ट मधील ती महिला माझी पत्नी आहे असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे. माझ्या पत्नीने आरएसएस कधी जाईन केलं ? हे मी घरी जावून विचारणार असल्याचे ते म्हणाले. आरएसएसने अशा प्रकारे फोटो वापरून पोस्ट फिरविणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. काम करत असताना अशा प्रकारच्या घटना घडत असतात; त्यामुळे इतक्या बारीक गोष्टीसाठी गुन्हा दाखल करणे मला योग्य वाटत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.