)
भारत कोकाटे हे मंत्री माणिकराव कोकाटेंचे बंधू आहेत. माणिकराव कोकाटे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आहेत, तर त्यांचे बंधू भारत कोकाटे यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे अनेक चर्चा सुरू झाल्यात. दोन्ही बंधूंमधील हे राजकीय मतभेद नेमके का आहेत, पाहुया या रिपोर्टमधून.
राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे हे राष्ट्रवादीत आहेत. माणिकराव राष्ट्रवादीचं काम करत असताना त्यांचे सख्खा भाऊ भारत कोकोटेंनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भारत कोकाटेंनी भाजपचं कमळ हाती घेतलं आहे. खरं तर भारत कोकाटे गेल्या अनेक वर्षांपासून माणिकराव कोकाटेंपासून लांब आहेत. राजकीय मतभेद असल्यानं भारत कोकाटेंनी वेगळा पक्ष आणि वेगळा मार्ग निवडला आहे. आताही ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात होते. तिथून त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे. माणिकरावांशी मतभेद आहेत मात्र कौटुंबिक कलह नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
भारत कोकाटेंनी भाजपमध्ये प्रवेश करताना आपण कोणत्याही पदासाठी प्रवेश केला नसून कार्यकर्त्यांची कामं करण्यासाठी भाजपसोबत गेल्याचं त्यांनी सांगितलं आहे. भारत कोकाटेंना भाजपमध्ये घेताना भाजपच्या नेत्यांनी काहीतरी विचार केला असावा. भाजप भारत कोकाटेंच्या रुपानं माणिकरावांसमोर आव्हान तर उभं करत नाही ना अशी कुजबूज सिन्नर भागात सुरु झाली आहे.
कार्यर्त्यांसाठी भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचं भारत कोकाटे सांगत असले तरी येत्या काळात ते विधानसभा निवडणुकीसाठी पक्षबांधणी करत नाही ना याकडं त्यांचे भाऊ माणिकराव कोकाटेंचं बारिक लक्ष असणार यात शंका नाही.