)
IPS Anjana Krishna: करमाळ्याच्या आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना कोर्टात खेचण्याचा इशारा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून देण्यात आलाय. अजित पवार आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातल्या संवादाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर चांगलंच राजकीय वातावरण तापलं होतं. यामध्ये अजित पवार आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना खडसावतांना दिसतायत. दरम्यान यानंतर आता राष्ट्रवादीच्या नेत्यांनी थेट अंजना कृष्णा यांनाच कोर्टात खेचण्याचा इशारा दिलाय.
उपमुख्यमंत्री अजित पवारांना सवाल करणा-या करमाळ्याच्या आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना दादांच्या राष्ट्रवादीकडून इशारा देण्यात आलाय.. मुरुम उत्खननावरून अंजना कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात फोन आणि व्हिडिओ कॉलवरून वाद झाला होता. फोनवर बोलताना अंजना कृष्णा यांनी अजित पवारांचा आवाज ओळखला नाही म्हणून अजित पवार संतापले होते.
अधिका-याला धमकवत असल्याचं सांगत विरोधकांनी थेट अजित पवारांवर कारवाईची मागणी केली. हा वाद वाढत असताना अजित पवार यांनी याबाबत स्पष्टीकरण देखील दिलं. मात्र, आता या महिला अधिका-याला थेट कोर्टात खेचण्याचा इशारा राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रुपाली ठोंबर-पाटील यांनी दिलाय.
तर याचसंदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी गृह विभागाकडे तक्रार केली असून कारवाईची मागणी केलीये. तर गुंड प्रवृत्तीच्या लोकंना अजित पवार समर्थन करत असल्याची टीकाही त्यांनी केलीये.
दरम्यान या वादात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही उडी घेतलीये. अजित पवार UPSC झालेल्या अधिका-याशी अशळा पद्धतीने बोलत असतील तर त्यांनी यशवंतराज चव्हाणांचं नाव घेऊ नये असा टोलाही हाकेंवी लगावलाय. हाकेंच्या टीकेला भाजपचे आमदार जयकुमार गोरेंनी उत्तर दिलंय.
आता अजित पवार राष्ट्रवादीकडून अंजना कृष्णा यांना कोर्टात ठेचण्याचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे आता यावार अजित पवार काय भूमिका घेतायत याकडे लक्ष लागलंय
उत्तर: हा वाद मुरूम उत्खननावरून उद्भवला, जेव्हा करमाळ्याच्या आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांनी बेकायदेशीर उत्खनन रोखण्यासाठी कारवाई केली. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने अजित पवारांना फोन लावला, आणि फोनवर बोलताना अंजना यांनी पवारांचा आवाज ओळखला नाही, ज्यामुळे पवार संतापले आणि त्यांनी अधिकाऱ्याला धमकावल्याचा आरोप विरोधकांनी केला.
उत्तर: अजित पवार यांच्याशी झालेल्या वादानंतर राष्ट्रवादीच्या महिला नेत्यांनी, विशेषतः रुपाली ठोंबर-पाटील यांनी, अंजना कृष्णा यांना कोर्टात खेचण्याचा इशारा दिला. हा इशारा वाद वाढत असताना आणि विरोधकांनी पवारांवर कारवाईची मागणी केल्यानंतर देण्यात आला, ज्यामुळे राजकीय तणाव वाढला आहे.
उत्तर: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गृह विभागाकडे तक्रार करून अजित पवारांवर कारवाईची मागणी केली असून, त्यांनी पवार गुंड प्रवृत्तीला समर्थन देत असल्याचा आरोप केला. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पवारांच्या वागण्यावर टीका करत त्यांनी यशवंतराव चव्हाणांचे नाव घेऊ नये असे म्हटले, तर भाजपचे जयकुमार गोरेंनी हाकेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.