मला पाडण्यासाठी भाजपनं 5 कोटी दिले; राष्ट्रवादीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचा भाजपवर गंभीर आरोप

राष्ट्रवादीचे गडचिरोलीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी भाजवर गंभीर आरोप केला आहे. विधानसभेत माझ्या पराभवासाठी भाजपनं डाव रचल्याचा आरोप धर्मरावबाबा यांनी केलाय.. दरम्यान धर्मरावबाबा आत्राम यांचे आरोप भाजपनं फेटाळले आहेत.

वनिता कांबळे | Updated: Oct 13, 2025, 11:36 PM IST
मला पाडण्यासाठी भाजपनं 5 कोटी दिले; राष्ट्रवादीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचा भाजपवर गंभीर आरोप

Dharmaraobaba Atram : येत्या काही दिवसात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींचं बिगुल वाजणार आहे. मात्र, त्याआधीच महायुतीत आरोप-प्रत्यारोपाचा सामना सुरू झालाय. गडचिरोलीचे राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी भाजवर गंभीर आरोप केला आहे. विधानसभेत मला पाडण्यासाठी भाजपनं 5 कोटी दिल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

Add Zee News as a Preferred Source

धर्मरावबाबा आत्राम यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर भाजपनं देखील पलटवार केला आहे. आरोप केला म्हणजे खरा होत नाही तसंच भाजपनं कधीही मित्रपक्षासोबत कुरघोडीचं राजकारण केलं नसल्याचं दरेकरांनी म्हटलं. धर्मरावबाबांच्या आरोपांचं प्रवीण दरेकरांनी खंडण केलंय. मात्र, दुसरीकडे छनग भुजबळांनी धर्मरावबाबांच्या वक्तव्याचं समर्थन केलेलं दिसलं.  असा प्रकार अनेक ठिकाणी झाल्याचं उदाहरण छगन भुजबळांनी दिलंय.. येवल्यातही याचं पद्धतीचं राजकारण झाल्याचं भुजबळांनी म्हटलं.

धर्मरावबाबांच्या वक्तव्यानंतर आता नव्या वादाला तोंड फुटलंय. येत्या काही दिवसात महाराष्ट्रात निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत राष्ट्रवादी विरूद्ध भाजप असा सामना पाहायला मिळाला आहे.. त्यामुळे आगामी निवडणुकीत गडचिरोलीमध्ये याचे पडसाद उमटू शकतात.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत फडणवीसांनी मोठं विधान 

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत फडणवीसांनी मोठं विधान केलंय.  त्यामुळे महायुतीत दोस्तीत कुस्ती होणार असल्याची शक्यता निर्माण झालीये... जिथे जिथे शक्य आहे तिथे युती केली पाहिजे अशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत. आणि युती झाली नाही तरी मित्रपक्षावर टीका करू नये अशा प्रकारचे निर्देश मी दिले आहेत. तसेच स्वबळावर लढण्याची कार्यकर्त्यांची इच्छा नेहमीच असते. परंतु त्या त्या ठिकाणच्या परिस्थितीचा विचार करून निर्णय करायचा असतो. अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिलीये...

About the Author

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

...Read More