अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने गुंडांना तिकीट देणं किती योग्य? सुप्रिया सुळेंनी दिलं उत्तर, म्हणाल्या 'तक्रार करुन....'

Supriya Sule on Ticket to Gaja Marne and Andker Gang: पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून गुंड गजा मारणेची पत्नी आणि आंदेकर कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यानंतर टीका केली जात असताना सुप्रिया सुळे यांनी त्यावर भाष्य केलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Jan 9, 2026, 01:33 PM IST
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने गुंडांना तिकीट देणं किती योग्य? सुप्रिया सुळेंनी दिलं उत्तर, म्हणाल्या 'तक्रार करुन....'

Supriya Sule on Ticket to Gaja Marne and Andker Gang: पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून गुंड गजा मारणेची पत्नी आणि आंदेकर कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे सर्व स्तरातून टीका होत असून गुंडांच्या कुटुंबीयांना उमेदवारी देण्यावरुन संताप व्यक्त केला जात आहे. यादरम्यान पुण्यात अजित पवारांसह युती केलेल्या सुप्रिया सुळे यांनी यावर भाष्य केलं आहे. कोणत्याच पक्षाने गुंडांना तिकीट देऊ नये. लोकशाहीसाठी हे घातकच आहे. हे सगळीकडे होत असून, कुठेतरी थांबलं पाहिजे असं मत त्यांनी 'झी 24 तास'च्या 'टू द पॉईंट विथ कमलेश सुतार' मुलाखतीत मांडलं आहे. 

Add Zee News as a Preferred Source

'सर्व पक्षांनी एकत्र बसून काहीतरी नियम, लक्ष्मणरेषा आखण्याची वेळ'

अजित पवारांच्या पक्षाकडून गुंड गजा मारणे आणि आंदेकर कुटुंबाला देण्यात आलेल्या तिकिटांबद्दल विचारण्यात आलं असता त्या म्हणाल्या की, "त्यांच्या कोट्यातून कोणाला तिकीट देणार आहेत हे माहिती नव्हतं. माझं म्हणणं आहे की, सर्वच पक्षांनी एकत्र बसून काहीतरी नियम, लक्ष्मणरेषा आखण्याची वेळ आली आहे. त्यांचं म्हणणं आहे की, पत्नीला दिलं असून, नवऱ्याला दिलं आहे. नवरा बायकोत एखादा नवऱ्याने चूक केली तर त्याचं खापर बाईला करावं लागतं. पण दरवेळी तिची चूक असते का? ती तिचं कर्तव्य म्हणून नवऱ्यासमोर उभी राहते".

पुण्यात अजित पवार आणि शरद पवारांच्या NCP ची युती कशी झाली? सुप्रिया सुळेंनी सगळंच उलगडलं

 

'कोणत्याच पक्षाने गुंडांना तिकीट देऊ नये'

"आपण त्याची तक्रार करुन या प्रकरणात गृह मंत्रालयाने मध्यस्थी केली पाहिजे. कोणत्याच पक्षाने अशा बाबतीत संवेदनशील असंलं पाहिजे. लोकशाही टिकवण्यासाठी लक्ष्मपणरेषा आखली पाहिजे. इलेक्टोरल रिफॉर्म्सबद्दल मी संसदेतही मुद्दा मांडला आहे. त्यांनी कोणाला तिकीट द्यावं हा त्यांचा अधिकार आहे. पण कोणत्याच पक्षाने गुंडांना तिकीट देऊ नये. लोकशाहीसाठी हे घातकच आहे. हे सगळीकडे होत असून, कुठेतरी थांबलं पाहिजे," असं मत त्यांनी मांडलं. 

'भाजपाच्या उपमुख्यमंत्र्यांवर खुनाचे आरोप'

 बिहारच्या भाजपाच्या उपमुख्यमंत्र्यांवर खुनाचे आरोप आहेत. एका केसमध्ये शिक्षा झाली, ज्याला त्यांनी आव्हान दिलं. या सगळ्या उदाहरणांबद्दल एकच मत आहे ते म्हणजे जे चुकीचं आहे ते आहे असंही म्हणाल्या. 

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More