New Controversy In Maharashtra: महाराष्ट्रातील काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान खासदार नाना पटोले यांनी 'ऑपरेशन सिंदूर'संदर्भात केलेल्या विधानावरुन नवीन वादाला तोंड फुटलं आहे. ‘ऑपरेशन सिंदूर म्हणजे लहान मुलांचा कॉम्प्युटर गेम आहे’, असं नाना पटोलेंनी म्हटलं आहे. या विधानावरुन आता भारतीय जनता पार्टीने नाना पटोलेंना लक्ष्य केलं आहे. नाना पटोलेंच्या या विधानावरुन काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ हे पुन्हा एकदा सिद्ध झालं असा घणाघात भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेख बावनकुळेंनी केला आहे.
"नाना पटोले म्हणजे मन आणि मेंदू भ्रष्ट झालेला नेता आहे", असा टोला बावनकुळेंनी लगावला आहे. "ऑपरेशन सिंदूर म्हणजे कॉम्प्युटर गेम नाही, तर पाकिस्तानी दहशतवाद्यांवर केलेली धाडसी कारवाई शत्रूंच्या मनात भीती निर्माण करणाऱ्या मोहिमेची हेटाळणी म्हणजे संपूर्ण भारतीयांचा अपमान आहे," असंही बावनकुळे म्हणाले आहेत. देशाच्या शौर्याचा उपहास, सर्जिकल स्ट्राइकवर संशय ही काँग्रेसची नीच मानसिकता पुन्हा उघड झाली आहे," असा टोला बावनकुळेंनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन लागवला आहे.
"‘ऑपरेशन सिंदूर म्हणजे कॉम्प्युटर गेम आहे’ असं संतापजनक वक्तव्य काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केलं आणि ‘काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ’ हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. भारताच्या शत्रूंच्या मनात भीती निर्माण करणाऱ्या या मोहिमेची हेटाळणी करणं म्हणजे फक्त वीर जवानांचा आणि त्यांच्या शौर्यांचा अपमान नाहीतर संपूर्ण भारतीयांचा अपमान आहे. नाना पटोले यांच्या या बाष्कळ विधानामुळे शहीद जवानांच्या कुटुंबियांना किती वेदना होणार आहेत, याची कल्पना या संवेदनाहीन माणसाला आहे की नाही?" असा सवाल बावनकुळेंनी उपस्थित केला आहे.
"नाना, ऑपरेशन सिंदूर म्हणजे कॉम्प्युटर गेम नाही तर पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर केलेली धाडसी आणि शौर्याची कारवाई आहे. ही देशद्रोह्यांच्या छातीत धडकी भरवणारी जाज्वल्य शौर्यगाथा आहे. देशाच्या जवानांचं शौर्य, दहशतवादाविरोधातली कारवाई आणि ‘भारत माते’च्या रक्षणासाठीचा लढा काँग्रेसला खेळ वाटतो? तुमचे नेते राहुल गांधीही परदेशात जाऊन भारताचा अवमान करतात. ‘सर्जिकल स्ट्राइक’चाही पुरावा मागण्याची नीच मानसिकता काँग्रेसनं दाखवली. पण देश उघड्या डोळ्यांनी पाहतोय की कोण वीरांच्या बाजूला आहे, आणि कोण पाकिस्तानच्या," असंही बावनकुळेंनी नाना पटोलेंवर निशाणा साधताना म्हटलं आहे.
‘ऑपरेशन सिंदूर म्हणजे कॉम्प्युटर गेम आहे’ असं संतापजनक वक्तव्य काँग्रेसचे नेते @NANA_PATOLE यांनी केलं आणि ‘काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ’ हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.
भारताच्या शत्रूंच्या मनात भीती निर्माण करणाऱ्या या मोहिमेची हेटाळणी करणं म्हणजे फक्त वीर जवानांचा आणि…
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) June 12, 2025
"नाना, तुमच्या या देशद्रोही मानसिकतेला देश कधीच माफ करणार नाही. तुमचा मन आणि मेंदू भ्रष्ट झाला आहे. मी तुमच्या नीच मानसिकतेचा कडाडून निषेध करीत आहे," असं बावनकुळेंनी पोस्टच्या शेवटी म्हटलं आहे.
AUS
(29 ov) 99/6 (70.3 ov) 225
|
VS |
WI
143(52.1 ov)
|
Full Scorecard → |
IND
(112.3 ov) 387 (62.1 ov) 192
|
VS |
ENG
387(119.2 ov) 170(74.5 ov)
|
England beat India by 22 runs | ||
Full Scorecard → |
BRN
(19 ov) 89
|
VS |
TAN
90/0(10.1 ov)
|
Tanzania beat Bahrain by 10 wickets | ||
Full Scorecard → |
GER
(20 ov) 219/7
|
VS |
MAW
182/7(20 ov)
|
Germany beat Malawi by 37 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.