Nitesh Rane : मंत्री नितेश राणेंनी (Nitesh Rane) 'जय शिवराय'च्या मुद्द्यावरून शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादीच्या नेत्यांना डिवचलं आहे. ज्यांचा पक्ष औरंगजेबाच्या (Aurangajeb) विचारावर चालतो त्यांनी जय शिवराय बोलू नये त्यांनी त्याऐवजी अल्ला हू अकबर बोलावं असा सल्ला नितेश राणेंनी दिला आहे. यावरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेत.
मत्स आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणेंनी 'जय शिवराय'च्या मुद्द्यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना डिवचलंय. ज्यांचा पक्ष औरंगजेबाच्या विचारावर चालतो त्यांनी जय शिवराय बोलू नये. त्यांनी त्याऐवजी अल्ला हू अकबर बोलावं असा सल्ला नितेश राणेंनी दिलाय. दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना फोनवर हॅलो ऐवजी जय शिवराय बोलण्याचा सल्ला दिला होता. त्यावरून नितेश राणेंनी सुनावलं आहे.
हेही वाचा : शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराचा मुद्दा तापला, नामविस्तारासाठी हिंदुत्वादी संघटना आक्रमक
तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने जय शिवराय म्हणण्याच्या घेतलेल्या निर्णयाचं आमदार अमोल मिटकरी यांनी स्वागत केलंय. दरम्यान छत्रपती शिवजी महाराजांचं नाव आपण आदरानं घेतो. त्यामुळे या निर्णयाचं स्वागत करायला हवं असं शरद पवारांच्या पक्षाचे आमदार रोहित पवारांनी म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे. तो राजकारणाचा नाही. मात्र दुर्दैवाने राज्यात केवळ राजकारणासाठी शिवरायांच्या नावाचा वापर होत असल्याचं पाहायला मिळतंय. हे खूप वेदनादायी आहे.