)
Nitesh Rane : आगामी निवडणुकीसाठी नितेश राणेंनी कोकणात स्वबळाचा नारा दिला आहे. टू द पॉईंट मुलाखतीमधून नितेश राणेंनी स्वबळासंदर्भात आपली रोखठोक भूमिका स्पष्ट केली. कोकणात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची ताकद सारखीच आहे. त्यामुळे एकत्र निवडणूक लढवल्यास कोकणात मोठ्या प्रमाणावर बंडखोरी होण्याची शक्यता आहे. या बंडखोरीचा फायदा मविआला होऊ शकतो. म्हणूनच कार्यकर्ते आणि नेत्यांनी स्वबळावर लढण्याची इच्छा व्यक्त केल्याचं नितेश राणेंनी म्हटलंय.
शिवसेनेत असताना उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना छळलं होतं असा आरोप नितेश राणेंनी केलाय. टू द पॉईंट विथ कमलेश सुतार या विशेष मुलाखतीत नितेश राणेंनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे युतीवर आपलं मत मांडलं. उद्धव ठाकरेंसोबत जाण्यानं राज ठाकरेंची विश्वासहर्ता कमी होईल असं भाकीतही त्यांनी केलंय. राज ठाकरेंना सोबत घेणं यात उद्धव ठाकरेंचा स्वार्थ असून उद्धव ठाकरे कोणाचेच होऊ शकत नाहीत असा टोलाही त्यांनी लगावलाय. झी 24 तासच्या टू द पॉईंटमध्ये नितेश राणेंनी निलेश राणेंबाबत केलेल्या वक्तव्यानंतर दोन्ही बंधूंमध्ये आलबेल नसल्याची चर्चा सुरू झालीय. कारण मागील काही दिवसांपासून निलेश राणे आपल्या धाकटे बंधू नितेश राणेंना ट्विटरवरूनच सल्ला देत होते. त्यासंबंधी विचारलं असता नितेश राणेंनी निलेश राणेंसंदर्भात एक सूचक विधान केलंय.
दरम्यान, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत विचारांचे सदस्य निवडून दिलात तर तुम्हाला विकास निधीसाठी कुठंही जाण्याची गरज नाही असं वादग्रस्त वक्तव्य मंत्री नितेश राणे यांनी केले. विकास निधीच्या चाव्या आमच्याच हातात आहे. आम्हीच त्या चाव्या फिरवतो,निधी वाटतो आणि आम्हीच निधीचे दरवाजा बंद करतो असं वक्तव्य नितेश राणेंनी केलं.
त्यामुळे आमच्या विचाराचे सदस्य निवडून दिलात तर विकास निधी साठी कुठंही जाण्याची गरज नाही.मात्र या निधीचे दरवाजे कसे बंद करायचे हे सुध्या आम्हाला बरोबर माहिती आहे असा इशारा पालकमंत्री नितेश राणे यांनी वेंगुर्ला येथे पक्षप्रवेश कार्यक्रमात दिला. तुम्हाला भरभरून निधी देण्याची जबाबदारी माझी आहे.पण त्यासाठी आमच्या विचाराचे सदस्य निवडून देण्याची गरज आहे. आमच्या विचाराचे सदस्य निवडून द्या आणि बिनधास्त रहा असंही पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.
FAQ
1 नितेश राणेंनी कोकणात स्वबळाचा नारा का दिला आहे?
आगामी निवडणुकीसाठी नितेश राणेंनी कोकणात स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. "टू द पॉईंट" मुलाखतीत त्यांनी स्पष्ट केले की, कोकणात भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेची ताकद समान आहे. एकत्र लढल्यास मोठ्या प्रमाणात बंडखोरी होऊ शकते, ज्याचा फायदा मविआला होईल. कार्यकर्ते आणि नेत्यांनी स्वबळावर लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
2 नितेश राणेंनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे युतीबाबत काय म्हटले?
"टू द पॉईंट विथ कमलेश सुतार" मुलाखतीत नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंनी शिवसेनेत असताना राज ठाकरेंना छळल्याचा आरोप केला. उद्धवांसोबत जाण्यानं राज ठाकरेंची विश्वासार्हता कमी होईल, असे भाकीत केले. राज ठाकरेंना सोबत घेण्यात उद्धवांचा स्वार्थ आहे आणि उद्धव कोणाचेच होऊ शकत नाहीत, असा टोला लगावला.
3 नितेश राणे आणि निलेश राणे यांच्यातील संबंधांबाबत चर्चा कशी सुरू झाली?
झी २४ तासच्या "टू द पॉईंट"मध्ये नितेश राणेंनी निलेश राणेंबाबत केलेल्या वक्तव्यानंतर दोन्ही बंधूंमध्ये आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली. मागील काही दिवसांत निलेश राणे ट्विटरवरून धाकट्या बंधू नितेश राणेंना सल्ला देत होते. यासंबंधी विचारले असता नितेश राणेंनी निलेशबाबत एक सूचक विधान केले.