)
Bombay High Court: कौटुंबिक संपत्तीसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय सुनावला आहे. या निर्णयामुळं हिंदु कुटुंबातील नात किंवा नातु यांचा आईच्या माहेरील संपत्तीवर जन्मसिद्ध हक्क होऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.
मुलीचा वडिलांच्या संपत्तीवर मुलाप्रमाणे समान अधिकार असतो. माझ्या आईचा आजोबांच्या संपत्तीवर हक्क आहे. त्यानुसार नात म्हणून माझाही आजोबांच्या मालमत्तेवर अधिकार आहे, असा दावा एका नातीने केला होता. मात्र न्या. शैलेश ब्राह्मणे यांच्या एकल पीठाने हा दावा फेटाळून लावला आहे.
वडिलांच्या संपत्तीवर मुलगी दावा करु शकते, तसा अधिकार कायद्याने दिलेला आहे. नातीने आजोबांच्या संपत्तीवर अधिकार सांगावा, असा कोणताही कायदा नाही. हिंदू मिताक्षरी कायद्यानुसार वडिलांच्या मालमत्तेवर मुलाचा अधिकार होता. या कायद्यात 2005 मध्ये सुधारणा करण्यात आली. या सुधारणेत मुलींना वडिलांच्या संपत्तीवर हक्क देणारी तरतूद करण्यात आली.
हिंदू मिताक्षरी कायद्यांतर्गंत, एखादा व्यक्ती त्याच्या पैतृक संपत्तीवर अधिकार व हिस्सा मिळवू शकतो. त्याचबरोबर त्या संपत्तीत हिस्सा आणि विभागणीची मागणी करण्याचा अधिकारदेखील मिळतो. सुरुवातीला हा कायदा मुलांपर्यंतच सिमीत होता. मात्र 2005च्या अधिनियमात बदल करुन मुलींनाही हक्क देण्यात आल्या आहेत. त्यांना समान हक्क देण्यात आले आहेत.
मुलाचा मुलगा आजोबांचा वंशज असतो. मुलीची मुलगी आजोबांची वंशज होत नाही. या नातीचा आजोबांच्या संपत्तीवर जन्मसिद्ध हक्क होऊ शकत नाही, असेही न्यायालयाने नमूद केले.
या आजोबांना चार मुले व चार मुली आहेत. यातील एका मुलीच्या मुलीने ही याचिका केली होती. माझ्या आईने तिच्या वडिलांच्या संपत्तीवरील अधिकार सोडलेला नाही. त्यामुळे मलाही या संपत्तीत वाटा हवा, अशी मागणी नातीने केली होती.
उत्तर: हिंदू कुटुंबातील नात किंवा नाती (मुलाची मुलगी) यांना आईच्या माहेरील (मातोश्रीच्या वडिलांच्या) संपत्तीवर जन्मसिद्ध हक्क होऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा न्यायालयाने दिला आहे. मुलीला वडिलांच्या संपत्तीवर हक्क आहे, पण तिच्या मुलाला तो हक्क मिळत नाही.
उत्तर: एका नातीने दावा केला होता की, तिच्या आईला आजोबांच्या (आईच्या वडिलांच्या) संपत्तीवर हक्क आहे, त्यानुसार तिला (नातीला)ही त्यात हिस्सा मिळायला हवा. मात्र, न्यायमूर्ती शैलेश ब्राह्मणे यांच्या एकल पीठाने हा दावा फेटाळला. आईने तिचा हिस्सा सोडलेला नसल्याने नातीला वाटा द्या, अशी याचिका होती.
उत्तर: २००५ मध्ये सुधारणा करून मुलींना वडिलांच्या संपत्तीवर मुलांसारखाच समान हक्क देण्यात आला. यापूर्वी हा कायदा फक्त मुलांपर्यंत मर्यादित होता. आता मुलींनाही पैतृक संपत्तीवर हिस्सा आणि विभागणीची मागणी करण्याचा अधिकार आहे.