OBC Reservation: आंदोलन उभं राहण्याआधीच ओबीसी नेत्यांमध्ये रुसवे फुगवे?

OBC Reservation: विदर्भातील ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनीही वेगळाच सूर आळवलाय. 

प्रविण दाभोळकर | Updated: Oct 17, 2025, 10:42 PM IST
OBC Reservation: आंदोलन उभं राहण्याआधीच ओबीसी नेत्यांमध्ये रुसवे फुगवे?
ओबीसी आंदोलन

OBC Reservation: ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर आंदोलन उभं करण्याची भाषा करणा-या ओबीसी नेत्यांमध्ये रुसवेफुगवे पाहायला मिळू लागलेत. बीडमध्ये आयोजित केलेल्या ओबीसी एल्गार मेळाव्याला आमंत्रण नसल्यानं विजय वडेट्टीवारांनी दांडी मारली. तर बबनराव तायवाडे हे हैदराबाद गॅझेटमुळं ओबीसी आरक्षणाला धक्का नसल्याचं सांगतायेत. दुसरीकडं महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेही भुजबळांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचा दावा करतायत.

Add Zee News as a Preferred Source

मराठा समाजाला कुणबी जात दाखला मिळवून देण्यासाठी मनोज जरांगेंच्या पाठिशी मराठा समाज एकवटला होता. एक नेता एक समाज एक आवाज अशी स्थिती मराठा आंदोलनात पाहायला मिळाली. दुसरीकडं आरक्षण बचावची हाक देणा-या ओबीसी नेत्यांमध्ये मात्र एकवाक्यता दिसत नाही.. बीडच्या मेळाव्याला आमंत्रण नसल्यानं काँग्रेस नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मेळाव्याकडं पाठ फिरवलीये. त्यांना ओबीसी आरक्षणापेक्षा मेळाव्याच्या निमंत्रण पत्रिका आली नाही याचंच जास्त दुखः झाल्याचं पाहायला मिळालं.

विदर्भातील ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनीही वेगळाच सूर आळवलाय. त्यांच्या मते हैदराबाद गॅजेटमुळं ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागत नाहीये. बीडच्या मेळाव्यातून ओबीसींची दिशाभूल होऊ नये असा टोला त्यांनी लगावलाय.

सरकारच्या जीआरमुळे ओबीसी आरक्षणात वाटेकरी निर्माण झाल्याचा आरोप छगन भुजबळांनी केलाय. ज्या बीडमध्ये जरांगेंच्या कार्यकर्त्यांनी धुमाकूळ घातला त्याच बीडमधून ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाची हाक दिलीय.

महसूलमंत्री आणि ओबीसी नेते चंद्रशेखर बावनकुळेंना भुजबळांचा दावा मान्य नाही. भुजबळांचा काहीतरी संभ्रम झाल्याचा दावा चंद्रशेखर बावनकुळेंनी केलाय.

ओबीसी नेत्यांमध्ये एकवाक्यता नाही, ओबीसी नेत्यांमध्ये एकजूटही नाही. त्यामुळं ओबीसी समाज त्यांचा आरक्षणाचा हक्क कसा मिळवणार असा प्रश्न सामान्य ओबीसी कार्यकर्त्यांमधून विचारला जातोय.

FAQ

प्रश्न: ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर नेत्यांमध्ये रुसवे-फुगवे का होत आहेत?

उत्तर: मराठा समाजाला कुणबी दाखल्यांद्वारे ओबीसी आरक्षण देणाऱ्या सरकारी जीआरमुळे ओबीसी नेत्यांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. छगन भुजबळ यांनी जीआरमुळे ओबीसी आरक्षणात वाटेकरी झाल्याचा आरोप केला, तर विजय वडेट्टीवार यांनी बीडमधील ओबीसी एल्गार मेळाव्याला आमंत्रण नसल्याने दांडी मारली. बबनराव तायवाडे यांनी हैदराबाद गॅझेटमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का नसल्याचे सांगितले, ज्यामुळे नेत्यांमध्ये एकजूट नव्हती आणि आंदोलन कमकुवत झाले.

प्रश्न: विजय वडेट्टीवार यांनी बीड मेळाव्याला का हजेरी लावली नाही?

उत्तर: काँग्रेस नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांना बीडमधील ओबीसी एल्गार मेळाव्याचे आमंत्रण मिळाले नाही, त्यामुळे त्यांनी मेळाव्याकडे पाठ फिरवली. त्यांना आमंत्रण न मिळाल्याने जास्त दुखावले गेले आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरही त्यांची भूमिका अप्रत्यक्षपणे प्रभावित झाली. यामुळे छगन भुजबळ यांनी सभेत वडेट्टीवार यांच्यावर टीका केली आणि त्यांचा व्हिडिओ दाखवून विरोधाभास उघड केला.

प्रश्न: बबनराव तायवाडे आणि चंद्रशेकर बावनकुळे यांची भूमिका काय आहे?

उत्तर: विदर्भातील ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी हैदराबाद गॅझेटमुळे ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का नसल्याचे सांगितले आणि बीड मेळाव्याने समाज दिशाभूल होईल असा टोला लगावला. महसूलमंत्री चंद्रशेकर बावनकुळे यांनी छगन भुजबळ यांच्या दाव्यावर संभ्रम असल्याचे सांगितले. यामुळे ओबीसी नेत्यांमध्ये एकवाक्यता नसल्याचा प्रश्न उपस्थित झाला आणि सामान्य कार्यकर्त्यांमध्ये आरक्षण हक्क मिळवण्याबाबत शंका निर्माण झाली.

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More