लासलगाव बाजारात कांद्याच्या दरात घसरण

यामुळे कांद्याच्या दरात मोठी घसरण 

Updated: Dec 10, 2019, 07:44 AM IST
लासलगाव बाजारात कांद्याच्या दरात घसरण

मुंबई : देशातील सर्वात मोठा बाजार लासलगावात सोमवारी कांद्याच्या दरात खूप मोठी घसरण पाहायला मिळाली. सोमवारी 9 डिसेंबर रोजी कांद्याचा दर प्रतिक्विंटल हा 5700 रुपये इतका होता. तर सरासरी मूल्य 4200 रुपये इतके होते. 

छोट्या कांद्याला कमीत कमी 2100 रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. सरकारने उचलेल्या पाऊलामुळे कांद्याच्या होलसेल दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. सरकारने कांद्याचा दर नियंत्रण आणण्यासाठी उजलेलं पाऊलच या घसरणीला कारणीभूत असल्याचं लासलगाव एपीएमसी मार्केटच्या चेअरमन सुवर्णा जगताप यांनी सांगितलं. 

महाराष्ट्रातील इतर बाजारांपेक्षा लासलगावात कांद्याची आवक वाढली आहे. या कारणामुळे यामध्ये घसरण पाहायला मिळाली. दर कमी झाल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. महत्वाचं म्हणजे लासलगाव बाजारात कांद्याची 5 हजार 248 क्विंटल आवक झाली आहे.

शुक्रवारी याच कांद्याचा दर प्रतिक्विंटल 9900 रुपये इतका होता. तर 3 हजार 274क्विंटल लाल कांद्याची आवक झाली आहे. गेल्या आठवड्यात लाल कांदाच्या सरासरी दर हा प्रतिक्विंटल 7000 रुपये इतका होता.  

सरकारने घेतलेला निर्णय 

कांद्याच्या दरात वाढ होऊन अगदी कांद्याने उंची गाठली. त्यानंतर सरकारने कांदा दरवाढीवर निर्णय घेतला की, इजिप्त, तुर्कीमध्ये 21 हजार मेट्रीक टन कांदा आयात केला. होलसेल व्यापाऱ्यांकरता 25 मेट्रिक टन कांदा आणि रिटेल व्यापाऱ्यांकरता 5 मेट्रिक टन कांदा साठवून ठेवण्याची परवानगी दिली आहे. 

व्यापाऱ्यांना कांदा साठवून ठेवण्याची मर्यादा असल्यामुळे बाजारात कांद्याची आवक वाढली आहे. गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, कर्नाटक, आंध्रप्रदेशमधूनही कांदा लासलगाव बाजारात पोहोचला आहे.