महाराष्ट्रातील पर्यटकाकडे सापडला पहलगाम हल्ल्यातील सर्वात मोठा पुरावा; पुण्यातील पर्यटकाच्या मोबाईलमध्ये...

पुण्यातील पर्यटकाच्या कॅमेऱ्यात  दहशतवादी कैद झाले आहेत. पहलगाम हल्ल्यातील सर्वात मोठा पुरावा मानला जात आहे. 

वनिता कांबळे | Updated: Apr 26, 2025, 04:53 PM IST
महाराष्ट्रातील पर्यटकाकडे सापडला पहलगाम हल्ल्यातील सर्वात मोठा पुरावा; पुण्यातील पर्यटकाच्या मोबाईलमध्ये...

Pahalgam terror attack : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरून गेला आहे.  22 एप्रिल रोजी दहशतवादी हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. भारताची तपास यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. जम्मू-काश्मीर भागात मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन सुरु आहे. अशातच महाराष्ट्रातील पर्यटकाकडे सापडला पहलगाम हल्ल्यातील सर्वात मोठा पुरावा सापडला आहे. 

काश्मीर येथील पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. त्यानंतर या दहशतवाद्यांचे फोटो आले समोर आले. देहूरोड मधील रहिवासी असलेले श्रीजीत रमेशन हे देखील त्याचवेळी काश्मीर मध्ये पर्यटनासाठी गेले होते. पहलगाम पासून साडेसात किलोमीटर वर असलेल्या बेताब व्हॅली याठिकाणी श्रीजीत आणि त्यांचे कुटुंबीय गेले होते. 

बेताब व्हॅली याठिकाणी गेल्यानंतर श्रीजीत हे आपल्या मुलीचा रिल्स काढत होते. हे रिल्स काढणं सुरू असतानाच संशयित दोन दहशतवादी या मुलीच्या पाठीमागून जात असल्याच कैद झालं आहे. श्रीजित रमेशन यांनी याबाबतची माहिती NIA (national intelligence agency) ला दिली असून या व्हिडिओ आणि फ़ोटोची संपूर्ण तपासणी ही NIA कडून केली जात आहे.

या फोटोंमुळे काही महत्वाचे प्रश्न निर्माण झालेत
 बेताब व्हॅली मध्ये हे दहशतवादी मागील अनेक दिवसांपासून वास्तव्यास होते का..?
 बेताब व्हॅली या परिसरात ते मागील अनेक दिवसांपासून रेकी करत होते का.?
 बेताब व्हॅली मध्ये या दहशतवाद्यांना पळून जाण्यासाठी किंवा लपण्यासाठी जागा नव्हती.. त्यामुळे त्यांनी पहलगाम व्हॅली निवडली का..?
 बेताब व्हॅली पेक्षा पहलगाम या ठिकाणी सर्वात जास्त पर्यटक येत असतात. त्यामुळे या दहशतवाद्यांनी पहलगाम हे ठिकाण निवडले का..?
भारतीय लष्करानं एक व्हिडिओ प्रसिद्ध केलाय.  या व्हिडिओमधून भारतीय सैन्य दलानं पाकिस्तानला इशारा दिलाय.. सदैव तयार, सदैव सतर्क असं या व्हिडिओमध्ये नमूद करण्यात आलंय. त्यामुळे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्करानं पाकिस्तानला या व्हिडिओद्वारे वॉर्निंग दिल्याची चर्चा आहे.