)
Pankaja Munde Dasara Melava 2025: मी लोकांना भेटले. जातीपातीचे जोखड गळून पडले आणि माणूस माणसाच्या मदतीला धावून आला. समाज आणि साखळी घडवण्याची आवश्यकता आहे. असा नेता सर्वांना आवश्यक आहे. माझ्या लोकांचं दु:ख शब्दात मांडता येणार नाही. पण आम्ही प्रत्येकाला मदत घेतली. जे शांतपणे, सज्जनासारखे बसल्यायत ते माझे लोक आहेत. जे गोंधळ घालतायत ते माझे नाही. इतकी वर्षे मी भाषण केल पण अशा बेशिस्तपणा कधी पाहिला नाही, अशी तंबी त्यांनी दंगा करणाऱ्या कार्यकर्त्यांना दिली.पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे भगवान भक्तीगडावरील भा सावरगाव घाट इथल्या भगवान भक्ती गडावर पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा होतोय.. वंचितांचा शोषितांचा मेळावा म्हणून पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याची ओळख आहे.या मेळाव्याचे हे 11 वे वर्ष आहे. या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी जिल्ह्यातूनच नाही तर राज्यभरातून भगवान बाबांचे भक्त - मुंडेंचे लाखो समर्थक भगवान भक्ती गडावर दाखल होत असतात.संत भगवान बाबाच्या जन्मभूमी असल्या कारणाने सावरगाव घाट येथे होणाऱ्या या मेळाव्याला महत्व आहे. दोन घास कमी खा पण शिक्षण घ्या. भगवान बाबाचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत.
मुंडे साहेबांचा वसा आणि वारसा मी जपेन. मी अठरा पगड जातीच्या माणसासाठी मी लढेन. सर्व जातीपातीसाठी लढेन, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. मी जातपात शिकले नाही. मी तुम्हाला भेटण्यासाठी आले. मला भाषणाचा मोह नाही, असेही त्या यावेळी म्हणाल्या.