'राजीनामा आधीच व्हायला हवा होता', पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया.

सोनेश्वर पाटील | Updated: Mar 4, 2025, 01:04 PM IST
'राजीनामा आधीच व्हायला हवा होता', पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

Dhananjay Munde resigns : संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर तब्बल 82 दिवसानंतर आता मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. मुंडेंच्या राजीनाम्यानंतर पंकजा मुंडे यांनी हा राजीनामा आधीच व्हायला हवा होता असं म्हटलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. संतोष देशमुख यांना मारण्याचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण मला यासंदर्भात काही माहिती नाही. पण मी सोशल मीडियावर फोटो पाहिले. संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडीओ उघडून बघण्याची माझी हिंमत झाली नाही. कारण ज्यांनी त्यांना इतक्या अमाणूसपणाने मारलं आणि त्याचा व्हिडीओ बनवला त्यांच्यामध्ये जेवढी निर्मनुष्यता आहे. ज्यामध्ये त्या व्हिडीओचा आपल्याला वापर करायचा आहे अशी निर्मनुष्यता ज्याच्यामध्ये आहे तशी माझ्यात नाहीये. 

Add Zee News as a Preferred Source

संतोष देशमुख यांच्या हत्यानंतर मी पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं होतं. 12 डिसेंबरला मी यासंदर्भात संपूर्ण भाषण केलं. आता यामध्ये कोण आहे. हत्या प्रकरणात कोणचा हात आहे. हे फक्त तपास यंत्रणेलाच माहिती आहे. त्यामुळे यामध्ये कोणतेही हस्तक्षेप मी करण्याचं कारण नाही. ज्या मुलांनी ही हत्या केली. त्यांच्यामुळे एक समाज एका अक्रोशामध्ये वावरत आहे. आता परिस्थिती तशी आहे. प्रत्येक गोष्ट जातीवर जातेय. आम्ही जेव्हा या खुर्चीवर बसलो तेव्हा आम्ही एक शपथ घेतली. कुठलाही ममत्व भाव न बाळगता कसलाही द्वेष न बाळगता काम करायला पाहिजे.   

राजीनामा फार आधी व्हायला हवा होता

संतोष देशमुख यांच्या निर्घण हत्या प्रकरणावर निषेध व्यक्त करताना मी मनापासून माफी मागते. त्यांच्या आईची. ज्यांनी त्यांची हत्या केली ते जर माझ्या पदरात असते तर मी देखील हेच म्हटले असते की त्यांना कठोर शिक्षा द्या. याच्या पलीकडे कोणताही राजकीय नेता भाष्य करू शकणार नाही. धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला याच मी स्वागत करते. हा राजीनामा फार आधी व्हायला हवा होता. त्याच्यापेक्षा ही शपथच व्हायला नाही पाहिजे होती. त्यामुळे या सर्व प्रकरणांना सामोरे जावे लागले नसते. घेणाऱ्यांनी देखील हा राजीनामा आधीच घ्यायला हवा होता. धनंजय मुंडे यांनी देखील राजीनामा आधीच देयला पाहिजे होता. जेव्हा आपण खुर्चीवर बसून विचार करत असतो. तेव्हा सर्वांचा सारखाच विचार करावा लागतो असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. 

About the Author

Soneshwar Patil

सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी डिजिटल मीडियासह व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. यामध्ये मनोरंजन, राजकीय घडामोडी, स्पोर्ट्स, टेक, व्हायरल व्हिडिओ तसेच राशी भविष्यसह चाणक्य नीति अशा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

...Read More