पुण्याच्या जमीन गैरव्यहार प्रकरणात पार्थ पवार यांचा थेट सहभाग; अंजली दमानिया डायरेक्ट कोर्टात पुरावे सादर करणार

पुणे जमीन गैरव्यवहारप्रकरणी अंजली दमानिया खरगे समितीची भेट घेणार. पार्थ यांचा जमीन प्रकरणातील रोल समितीला सांगणार. समाधान झालं नाहीतर कोर्टात जाणार असल्याचे अंजली दमानिया म्हणाल्या. 

वनिता कांबळे | Updated: Nov 15, 2025, 11:31 PM IST
पुण्याच्या जमीन गैरव्यहार प्रकरणात पार्थ पवार यांचा थेट सहभाग; अंजली दमानिया डायरेक्ट कोर्टात पुरावे सादर करणार

Anjali Damania Allegation on Ajit Pawar : पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरण  झी 24 तासनं उघडकीस आणले.  उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनी आपल्या अमेडिया कंपनीच्या माध्यमातून कोरेगाव पार्क येथे 40 एकर जमिनीचा व्यवहार केला.  जमिनीची विक्री करणा-या शीतल तेजवानी, अमेडिया कंपनीतील पार्थ पवार यांचे भागीदार दिग्विजय पाटील आणि  सह दुय्यम निबंधक रवींद्र तारु यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.  गुन्हा दाखल झाल्यानंतर जमीन गैरव्यवहार प्रकराणात सर्वात मोठा खुलासा झाला आहे. अमेडिया कंपनीत पार्थ पवार यांचे 99 टक्के तर  दिग्वीजय फक्त 1 टक्का भागिदार आहेत. अमेडिया एन्टरप्रायझेस कंपनीत पार्थ पवार यांची भागिदारी 99 टक्के आहे, तर दिग्विजय पाटील यांची भागिदारी अवघी 1 टक्का इतकीच आहे. मात्र अजित पवार यांचे पुत्र असल्यामुळे पार्थ पवार यांच्यावर FIR दाखल झाला नसल्याचा आरोप दमानियांनी केला.  पुण्याच्या जमीन गैरव्यहार प्रकरणात पार्थ पवार यांचा थेट सहभाग आहे. अंजली दमानिया डायरेक्ट कोर्टात पुरावे सादर करणार आहेत. 

Add Zee News as a Preferred Source

 झी २४ तासनं बाहेर काढलेल्या कोरेगाव पार्कमधील जमीन गैरव्यवहार प्रकरणात कोर्टाचे दरवाजे ठोठावणार असल्याचा इशारा अंजली दमानियांनी दिला आहे. टू द पॉईंट मुलाखतीत अंजली दमानियांनी आपली रोखठोक भूमिका मांडली. जमीन गैरव्यवहाराचा तपास करणा-या खरगे समितीसमोर आपण अमेडिया आणि पार्थ पवार कसे या प्रकरणात थेट सहभागी असल्याचे पुरावे देणार असल्याचं त्या म्हणाल्या.  खरगे समितीनं म्हणणं ऐकून घेतलं नाहीतर या प्रकरणी आपण थेट कोर्टात जाणार असल्याचंही दमानिया म्हणाल्या. अमेडिया कंपनीचे खरे मालक पार्थ पवारच असून जमीन गैरव्यवहारात त्यांची थेट सही नसली तरी त्यांची भूमिका महत्वाची असल्याचं अंजली दमानियांनी सांगितलंय.

पार्थ पवारांवर गुन्हा दाखल व्हावा यासाठी आक्रमक झालेल्या अंजली दमानियांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांवर आरोप केलेत. जरंडेश्वर साखर कारखाना खरेदी करण्यासाठी गुरु कमोडिटीज  या कंपनीत ओंकार बिल्डरनं 44 कोटी टाकल्याचा दावा अंजली दमानियांनी केलाय. गुरु कमोडिटीज ही कंपनी अजित पवारांशी संबंधित असल्याचा दावाही त्यांनी केलाय. या प्रकरणात गुरु कमोडिटीज आणि इतर कंपन्यांमधून झालेला कोट्यवधी रुपयांचा व्यवहार हा चुकीच्या मार्गानं झाल्याचा आरोप त्यांनी झी २४तासच्या टू द पॉईंट या कार्यक्रमात केलाय.

झी २४ तासनं बाहेर काढलेल्या कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरणाची जिल्हाधिका-यांना पूर्ण कल्पना होती असा खळबळजनक आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी केलाय. टू द पॉईंट विथ कमलेश सुतार या मुलाखतीत दमानियांनी पुण्याच्या जिल्हाधिका-यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप केला.अमेडिया कंपनीनं जमीन व्यवहार मे महिन्यात केल्यानंतर जून महिन्यानंतर बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियावर जमीन रिकामी करण्यासाठी दबाव आणला होता. या संदर्भात बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियानं एक पत्रही जिल्हाधिका-यांना लिहिलं होतं. त्यावर जिल्हाधिका-यांनी संबंधित प्रांत आणि तहसीलदारांना याबाबत सूचना दिल्याचा दावाही दमानियांनी केलाय. जिल्हाधिका-यांनी जाणिवपूर्वक या प्रकरणाकडं दुर्लक्ष केल्याचा आरोप दमानियांनी केलाय. पुण्याच्या जिल्हाधिका-यांना निलंबित करण्यात यावं किंवा त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी अंजली दमानियांनी केलीय.

 

About the Author

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

...Read More