डोंबिवली : तरुण सतत छेड काढतो, त्रास देतो इतकेच नाही तर आपले महिलेवर प्रेम असल्याचे थेट तिच्या पतीलाच सांगतो. या सर्व प्रकारामुळे संतप्त झालेल्या एका महिलेने 30 वर्षीय तरुणाचे आपल्या दोन मित्रांच्या मदतीने गुप्तांग कापल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री जुन्या डोंबिवलीत घडली.  या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत तुषार पूजारे हा तरूण गंभीर जखमी झाला असून त्याला डोंबिवलीतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी महिला आणि तिच्या दोन्ही साथीदारांना अटक केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्रास देणाऱ्या तरुण हा या महिलेच्या शेजारी आहे. तो नेहमी महिलेची छेड काढायचा. तसेच आपले प्रेम आहे, असे त्यांने तिच्या पतीला सांगितले. या सर्व प्रकाराला त्रासलेल्या महिलेने तुषार या तरुणाला धडा शिकविण्याचे ठरविले. त्याच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी महिलेने एक प्लान आखला. त्यानुसार तुषारला नांदीवली टेकडी येथील एका निर्जनस्थळी बोलावले. तो आल्यानंतर या महिलेने प्रतिक केनिया आणि तेजस म्हात्रे यांच्या मदतीने त्याचे गुप्तांग कापले, अशी माहिती पोलिसांनी दिली.


या घटनेची  माहिती मिळताच मानपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यांनतर अधिक तपास करत याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी महिलेसह प्रतिक केनिया आणि तेजस म्हात्रे यांना अटक केली.