वीजबिलावर कुत्र्याचा फोटो; महावितरणची कामगिरी
....
पुणे: 'ऐकावे ते नवलच आणि पहावे ते भयंकरच' अशा पद्धतीचा 'महावितरणचा' कारभार सुरू असल्याचे चित्र आहे. महिन्याच्या वीजबिलावर शुन्यू रूपये भाडे अकारून ते न भरल्यास दहा रूपये दंड भरण्याची अचाट कामगिरी 'महावितरण'ने नुकतीच करून दाखवली. त्यानंतर चौफेर टीका झाल्यावर त्यातून काहीतरी बोध होईल अशी आशा ग्राहकांना होती. मात्र, बोध तर सोडाच आता तर महवितरणच्या मासिक वीजबिलावर चक्क कुत्र्याचे फोटो छापून येऊ लागले आहेत. पुणे परिसारात हा प्रकार घडला आहे.
'महावितरण'ची बहुतेक कामे एजन्सीमार्फत
'महावितरण' बहुतेक कामे एजन्सीमार्फत करत असल्याचे समजते. त्यामुळे अनेकदा वीजबिल योग्य वेळेत ग्राहकांपर्यंत न पोहोचणे, चुकीचे बिल, वेळेवर रिडींग न घेणे आदी प्रकार घडत असतात. ग्राहकांनाही आता या प्रकाराची बऱ्यापैकी सवय झाली आहे. पण, आता वीजबिलावर रीडिंग दाखवण्याच्या ठिकाणी चक्क श्वानच अवतरल्यामुळे ग्राहकांमध्ये या प्रकाराची भलतीच चर्चा सुरू आहे.
चुका टाळण्यासाठी काळजी घेणार - महावितरण
धनकवडी विभागाचे उप अभियंता मधोळकर यांच्या हवाल्याने या प्रकाराबाबत 'मटा'ने दिलेल्या वृत्तानुसार, अशा प्रकारच्या चुका होऊ नयेत म्हणून काळजी घेतली जाते. तरी झालेल्या चुकीबद्दल संबंधित एजन्सीला विचारणा केली जाईल, तसेच अन्य काहीही समस्येचे निराकरण करण्यासाठी सर्व अधिकारी कर्मचारी कायमच तत्पर असतात. तसेच अशा प्रकारच्या चुका होऊ नयेत म्हणून काळजी घेतली जाईल, असे महावितरणचे म्हणने आहे.