Political News : 'लाडकी बहीण योजनेमुळं इतर खात्यांवर अन्याय होतोय' असं म्हणत सरकारला घरचा आहेर देणाऱ्या गणेश नाईक यांना आता त्यांच्या या वक्तव्यासह त्यांच्याकडे असणाऱ्या वनविभागाच्या कारभारासंदर्भात थेट सवाल करत खासदार श्रीकांत शिंदे यांनी टोला लगावला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी नवी मुंबईत अभिनंदन मेळाव्यासाठी उपस्थित राहिले असता तिथं त्यांनी यासंदर्भातील वक्तव्य केलं.
राज्यातील वनविभागात नेमका काय प्रकार सुरू आहे याबाबत आपल्या कानावर आलं असून, त्यावर आपण फार काही बोलत नाही. मात्र, वनखात्याला पैसे कमी पडत असल्यामुळं आता सागाची झाड तोडायची म्हणतायत त्यातुन पैसे घ्यायचे म्हणतात, याची माहिती मिळवणं गरजेचं असल्याचं शिंदे म्हणाले.
बिबट्याची दहशत पाहता त्यासाठी जंगलात आधी शेळ्या सोडल्या जाणार होत्या, आता म्हणे फळझाडं लावू असं म्हणत बिबटे शाकाहारी आहेत की मांसाहारी हे माहित करून घेत वनखात्याचा कारभार पाहावा असं खोचक स्वरात शिंदेंनी नाईकांना सुचवलं. 'बिबट नाही सांभाळता येत वाघाच्या कुठे नादी लगता तुम्ही...', असा टोला लगावत एकनाथ शिंदेंना निशाण्यावर घेणाऱ्या गणेश नाईक यांच्यावरच यावेळी श्रीकांत शिंदे यांनी निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं.
'जेवढं झेपत तेवढं बोललं पाहिजे. कोत्या मनासारखं चाललाय सगळं मलाच मिळालं पाहिजे. युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम केलं नाही पाहिजे', असं म्हणत परिवहन खात्याचा विषय काढलात तर, एकनाथ शिंदे यांचं सगळ्यावर बारीक लक्ष असून इथे हुकूमशाहीचं राज्य नाही असं त्यांनी स्पष्टपणे नाईकांना सुनावलं. नवी मुंबई मनपा जिंकली म्हणून काहीजण फुशारक्या मारत आहेत त्यांनी निसटता विजय मिळवला हे लक्षात ठेवावं, 'हम हम है. बाकी सब पानी कम है' अशा शब्दांत त्यांनी नाईकांना आव्हान दिलं.
सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत.
...Read More|
IND
(20 ov) 255/5
|
VS |
NZ
159(19 ov)
|
| India beat New Zealand by 96 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
BRN
(20 ov) 130/7
|
VS |
MAS
128(19.5 ov)
|
| Bahrain beat Malaysia by 2 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
MAS
(20 ov) 140/7
|
VS |
BRN
106(18.5 ov)
|
| Malaysia beat Bahrain by 34 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.