)
Prakash Mahajan on Pramod Mahajan Death : तब्बल 19 वर्षांपूर्वी 3 मे 2006 मध्ये भाजप नेते प्रमोद महाजन यांची राहत्या घरी त्यांची भाऊ प्रवीण महाजनने हत्या केली. या घटनेनंतर मुंबईसह देशभरात खळबळ माजली होती. या हत्येमागे अनेक कारणं सांगण्यात येत होते. पण आज 19 वर्षांनंतर प्रमोद महाजन यांचे बंधू प्रकाश महाजन यांनी हत्येमागील कारण सांगितलं आहे. प्रमोद महाजन यांच्या हत्येसंदर्भात सनसनाटी खुलाससह गौप्यस्फोट केला आहे. प्रकाश महाजन म्हणाले की, प्रवीण हा प्रमोद महाजन यांना केवळ पैशांसाठी ब्लॅकमेल करत होता, असा दावा त्यांनी केला आहे. एवढंच नाहीत ज्या व्यक्तीच्या माध्यमातून ते ब्लॅकमेलिंग करत होते ती व्यक्ती आजही जिवंत असून मी त्याचं नाव घेणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.
नुकताच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाली की, प्रमोद महाजन यांची हत्या ही फक्त पैशांच्या हव्यासातून आणि मत्सरातून झाली आहे. सारंगी महाजन यांनी गोपीनाथ मुंडेंच्या वारसावरून पंकजा मुंडे यांच्यावर बोचरी टीका करताना बिघडलेली मुलगी असा उल्लेख केला होता. यावर बोलताना प्रकाश महाजन यांनी सारंगी महाजन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
प्रकाश महाजन म्हणाले की, 'प्रमोद महाजन यांना ब्लॅकमेल करण्यात येत होतं. प्रवीण महाजनने भाऊ प्रमोद महाजन यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. हेच बोलताना ते असंही म्हणाले की, प्रमोद राक्षस असला तरी त्याला गोळ्या घालायचा अधिकार कोण दिला? केवळ पैशांसाठी, लोभासाठी, आणि स्वार्थासाठी हा खून झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ठाण्यातील अनेक लोकांना याची माहिती असून काही आजही जिवंत असल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. ते पुढे म्हणतात, प्रवीण महाजन स्वतः काही काम करत नव्हता. नोकरीला जायत नव्हता आणि कंपनीकडून पगार वाढ मागायचा, पैसे मागायचे एवढाच त्यांचा उद्योग होता, असा आरोप त्यांनी केला आहे. शेवटी जेव्हा मनुष्य एकटा पडतो, अपराधभाव आणि लोभ त्याला खातो तसंच झालं. त्याच्या मृत्यूचं खरं कारण हाच भूतकाळ होता, असंही प्रकाश महाजन यावेळी म्हणालेत.
प्रकाश महाजन पुढे म्हणाले की, गोपीनाथ मुंडे यांनी प्रवीण महाजन यांच्या विरोधात साक्ष दिली होती. त्या क्षणापासून एक वैर पेटलं, आणि आज जी बदनामी, हीच त्याच वैराची सावली असल्याचं ते म्हणालेत. मुंडे साहेबांनी सारंगी आणि प्रवीण यांच्या नावावर विश्वास ठेवून जमीन घेतली होती. आज त्याच जमिनीवरून केस करून पंकजा मुंडेवर डाग लावले जात आहेत. केवळ ‘महाजन’ हे आडनाव असल्यामुळे लोक गप्प आहेत, पण जर धनंजय आणि पंकजांनी आवाज उठवला, तर उद्या वकीलसुद्धा त्यांना मिळणं कठीण होईल, असा इशाराही त्यांनी यावेळी सारंगी महाजन यांना दिला.
प्रकाश महाजन यांनी सारंगी महाजन यांच्यावर अत्यंत कठोर शब्दांत हल्लाबोल करताना ते म्हणाले की, सारंगीला वाटतं पंकजा बिघडलेली आहे. पण तुम्ही परळीला जा आणि लोकांना विचारा, कोण बिघडलेलं आहे ते कळेल. तुम्हाला रक्ताचं नातं नसू शकतं, पण मला आहे. वडील गेल्यावर त्या मुलीवर किती संकटं आली हे मला ठाऊक आहे. आणि तुम्ही केवळ स्वार्थासाठी तिच्यावर बोट ठेवता?. तुम्हाला गोपीनाथ मुंडेंचा फोन गेल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा व्हिसा मिळतो, तुम्हाला प्रमोद महाजनने सांगितल्यावर अमेरिकेचा व्हिसा मिळतो, त्यावेळी तुम्हाला प्रवीण महाजन, गोपीनाथ मुंडे चालत होते, त्यांच्या मुलीची बदनामी करताना थोडी सुद्धा तुम्हाला लाज वाटत नाही का? अशा कठोर शब्दात प्रकाश महाजन यांनी सारंगीला जाब विचारला.
प्रकाश महाजन यांच्या आरोपावर सारंगी महाजन यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्या म्हणाल्यात की, गोपीनाथ मुंडे यांनी न्यायालयात प्रवीण महाजन यांच्याविरोधात साक्ष दिल्याने मी त्यांच्या मुलीवर आरोप करते, हा प्रवीण महाजनांचा आरोप अयोग्य आहे. मी गोपीनाथ मुंडे यांची बदनामी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. न्यायालयीन खटला एकीकडे आणि वारसा हक्काचा मुद्दा एकीकडे. मी जे काही बोलले त्याचा गोपीनाथ मुंडे यांनी दिलेल्या साक्षीशी काहीही संबंध नाही. मी पंकजा मुंडे यांना बिघडलेली मुलगी म्हटले ते राजकारणासंदर्भात होते. पंकजा मुंडे या व्यक्तिश: खूप चांगल्या व्यक्ती असू शकतात, त्या मनाने कोमल असू शकतात. पण ती राजकारणात बिघडलेली आहे. लोकांच्या नजरेत ते दिसते. मी कोणावरही व्यक्तिश: आरोप केलेले नाहीत. वारसा हक्काविषयी मी जे बोलले ते, मी सामाजिक मुद्द्याला धरुन बोलले, असं त्या म्हणाल्यात.
प्रश्न १: प्रमोद महाजन यांची हत्या कधी आणि कशी झाली?
उत्तर: प्रमोद महाजन यांची हत्या त्यांच्या भावाने प्रवीण महाजनने ३ मे २००६ रोजी मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी केली. गोळ्या घालून हत्या करण्यात आली, ज्यामुळे मुंबईसह देशभरात खळबळ माजली होती.
प्रश्न २: १९ वर्षांनंतर प्रकाश महाजन यांनी हत्येचे कारण काय सांगितले?
उत्तर: प्रकाश महाजन यांनी सांगितले की, प्रवीण महाजन हा प्रमोद महाजन यांना पैशांसाठी ब्लॅकमेल करत होता. हत्या ही फक्त पैशांच्या हव्यासातून, लोभातून आणि मत्सरातून झाली. प्रवीण स्वतः काम करत नव्हता, नोकरीत पगार वाढ आणि पैसे मागण्याचा उद्योग चालवत होता.
प्रश्न ३: ब्लॅकमेलिंग प्रकरणात कोणाचा सहभाग होता?
उत्तर: ब्लॅकमेलिंगमध्ये प्रवीण महाजन ज्या व्यक्तीच्या माध्यमातून प्रमोद यांच्यावर दबाव टाकत होता, ती व्यक्ती आजही जिवंत आहे. प्रकाश महाजन यांनी तिचे नाव उघड केले नाही, पण ठाण्यातील अनेक लोकांना याची माहिती असल्याचे सांगितले.