Prakashdada Solanke : प्रकाश सोळंके यांनी धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत धनंजय मुंडे माझ्याविरोधात रणनीती आखत आहेत. माझ्या उमेदवारांच्या पराभवासाठी धनंजय मुंडे बैठका घेत असल्याचा आरोप प्रकाश सोळंके यांनी केला आहे. पाहुयात सविस्तर
बीडमध्ये राष्ट्रवादीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी त्यांच्याच पक्षातील सहकारी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केला आहे. धनंजय मुंडे माझा पराभव करण्यासाठी माझ्या विरोधकांसोबत बैठका घेत असल्याचा मोठा आरोप प्रकाश सोळंके यांनी केला आहे.
धनंजय मुंडे यांनी परळीतील नाथरा गावातील फार्म हाऊसवर प्लॅन आखल्याचा आरोप सोळंकेंनी केला आहे. मात्र, प्रकाश सोळंकेंचे आरोप बहुजन विकास मोर्चाचे बाबुराव पोटभरेंनी फेटाळले आहेत. धनंजय मुंडेंच्या फार्म हाऊसवरील बैठकीत आम्ही होतो. त्या बैठकीत प्रकाश सोळंकेसंदर्भात कोणतीही चर्चा झाली नसल्याचं पोटभरे यांनी म्हटलंय.
धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केल्यानंतर या राजकीय आरोप प्रत्यारोपात ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी देखील उडी घेतली आहे. प्रकाश सोळंके हे ओबीसींचा द्वेष करतात, तसंच त्यांची बुद्धी भ्रष्ट झाल्याची बोचरी टीका नवनाथ वाघमारे यांनी केली आहे. बीडमधील संतोष देशमुख प्रकरणावरून प्रकाश सोळंके यांनी धनंजय मुंडेवर गंभीर आरोप केले होता. वाल्मिक कराडवरून सोळंकेंनी धनंजय मुंडेंना लक्ष्य केलं होतं.
दरम्यान यानंतर आता पुन्हा एकदा प्रकाश सोळंकेंनी धनंजय मुंडेंवर आरोपांची राळ उठवलीय. त्यामुळे धनंजय मुंडे आणि प्रकाश सोळंकेच्या या वादानंतर अजित पवार कोणती भूमिका घेतात याकडे आता लक्ष लागलंय.
FAQ
हा वाद नेमका कशामुळे सुरु झाला?
बीड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी त्यांच्या स्वतःच्या पक्षातील सहकारी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले.
प्रकाश सोळंके यांनी नेमके कोणते आरोप केले?
धनंजय मुंडे माझा पराभव करण्यासाठी विरोधकांसोबत गुप्त रणनीती आखत आहेत, असा आरोप. माझ्या उमेदवारांना हरवण्यासाठी बैठका घेत आहेत, असा दावा. परळीतील नाथरा गावातील फार्महाऊसवर प्लॅन तयार झाला, असा आरोप.
या आरोपांवर धनंजय मुंडे किंवा त्यांच्या समर्थकांनी काय प्रतिक्रिया दिली?
बहुजन विकास मोर्चाचे नेते बाबुराव पोटभरे यांनी हे आरोप फेटाळले. त्यांच्या म्हणण्यानुसार—आम्ही धनंजय मुंडेंच्या फार्महाऊसवरील बैठकीत उपस्थित होतो. त्या बैठकीत प्रकाश सोळंकेविषयी कोणतीही चर्चा झाली नाही.
सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी डिजिटल मीडियासह व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. यामध्ये मनोरंजन, राजकीय घडामोडी, स्पोर्ट्स, टेक, व्हायरल व्हिडिओ तसेच राशी भविष्यसह चाणक्य नीति अशा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे.
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.