Prashant Koratkar : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी आक्षेपार्ह टिप्पणी करणारा आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरची अटक अटळ आहे. हायकोर्टानेही प्रशांत कोरटकरला दिलासा दिलेला नाही. प्रशांत कोरटकरच्या अटकपूर्व जामीनाची सुनावणी हायकोर्टाने सोमवारपर्यंत लांबणीवर टाकली आहे.
अटकपूर्व जामिन मिळवण्यासाठी धावाधाव करणाऱ्या प्रशांत कोरटकरला हायकोर्टाकडूनही दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे प्रशांत कोरटकरला कधीही अटक होऊ शकते. कोल्हापूरच्या सत्र न्यायलयाने नुकताच त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. न्यायालयाच्या या निर्णयानंतर त्याला कोणत्याही क्षणी अटक केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे असतानाच प्रशांत कोरटकरने थेट हायकोर्टात धाव घेतली आहे.
दरम्यान प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावरील सुनावणी हायकोर्टाने सोमवारपर्यंत पुढे ढकलली आहे. त्यामुळे प्रशांत कोरटकरची अटक अटळ आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी आक्षेपार्ह टिप्पणी आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी प्रकरणात प्रशांत कोरटकरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेला कोरटकर कुणीकडे?
- शिवरायांवर आक्षेपार्ह टिपण्णी आणि इंद्रजीत सावंतांना धमकीप्रकरणी गुन्हा
- कोल्हापूर सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला
- कोरटकरची अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात धाव
- हायकोर्टाकडूनही कोरटकरला दिलासा नाहीच
- हायकोर्टाकडून कोरटकरच्या अर्जावरील सुनावणी लांबणीवर
- कोरटकरच्या अर्जावर सोमवारी सुनावणी
- त्यामुळे कोरटकरची अटक अटळ
प्रशांत कोरटकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्यांना अटक होणारच असं सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे प्रशांत कोरटकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत मराठा क्रांती मोर्चाने जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करत केली आहे.
25 फेब्रुवारीला गुन्हा दाखल झाल्यापासून प्रशांत कोरटकर फरार आहे. अटक पूर्व जामिन अर्ज फेटाळल्यानंतरही प्रशांत कोरटकर पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे प्रशांत कोरटकर कुठे लपून बसलाय की जो पोलिसांनाही सापडत नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.