'शेतकऱ्यांना एक लाख रुपये द्या, अन्यथा...'; पडोळेंच्या धमकीनं वादाला तोंड

केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांबाबत असलेलं धोरण बदलावं आणि हेक्टरी एक लाख रुपयांची मदत करावी, नाहीतर तुम्हाला उडवून देऊ असा धमकीवजा इशारा गोंदियाचे काँग्रेस खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी दिला. 

मानसी क्षीरसागर | Updated: Nov 4, 2025, 10:44 PM IST
'शेतकऱ्यांना एक लाख रुपये द्या, अन्यथा...'; पडोळेंच्या धमकीनं वादाला तोंड
Prashant Padole congress bhandara mp threat to narendra modi devendra fadnavis on farmers protest loan waive

शेतकऱ्यांबाबत असलेलं धोरण बदलावं आणि हेक्टरी एक लाख रुपयांची मदत करावी, नाहीतर तुम्हाला उडवून देऊ असा धमकीवजा इशारा गोंदियाचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांनी दिला.त्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर पडोळे यांनी आता यूटर्न घेतलाय. पाहुयात काय घडलंय.

Add Zee News as a Preferred Source

शेतक-यांच्या मुद्द्यावरून राज्यात मोठं आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर सरकारने कर्जमाफीची तारिखही जाहीर केली. अशातच आता शेतक-यांच्या प्रश्नावरून आक्रमक झालेल्या भंडा-यातील काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना धमकीच देऊन टाकलीये. शेतक-यांना 1 लाख रुपये दिले नाहीत तर तुम्हाला उडवून टाकू अशी धमकीच प्रशांत पडोळेंनी दिलीये. भंडारा आणि गोंदियात अतिवृष्टीमुळे धान पिकांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी शेतक-यांच्या प्रश्नाकडे तातडीने लक्ष द्यावी अशी मागणी त्यांनी केलीये. मात्र त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावर सत्ताधा-यांनी टीका केलीये. 

तर खासदारांनी बोलताना तारतम्य बाळगावं आणि अशी बालिशपणाची वक्तव्यं करू नये असा सल्ला महसूल मंत्री चंद्रशेखर यांनी पडोळेंना दिलाय. तर शिवसेना UBTचे नेते अंबादास दानवेंनी पडोळेंच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतला जात असल्याचं म्हणत सत्ताधा-यांना उत्तर दिलंय. 

प्रशांत पडोळेंच्या या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाल्यानंतर पडोळे यांनी यूटर्न घेतलाय. सत्तेवरुन उडवून टाकू असं आपल्याला म्हणायचं होतं अशी सारवासारव पडोळेंनी केलीय.शेतक-यांच्या मुद्द्यावरून शेतकरी नेते आणि विरोधक आक्रमक झालेत. काही दिवसांपूर्वीच बच्चू कडू यांनीही आमदाराला कापण्याचं वादग्रस्त विधान केलं होतं. त्यामुळेही मोठा वाद निर्माण झाला होता. आता त्यात पडोळेंच्या वक्तव्याने भर टाकलीये.

About the Author

Mansi kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्रा टाइम डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि अर्थ (infrastructure) या विषयात विशेष रुची आहे. त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड. इन्फ्रास्ट्रक्चर आणि गुन्हे या बातम्यांमध्ये हातखंडा.

...Read More