Primary Teachers 17th Session in Ratnagiri : राज्यातील शिक्षकांसाठी (Teachers) राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात केंद्रप्रमुखांच्या सगळ्या जागा भरल्या जातील. तसेच शिक्षक सेवकांना 16 हजार रुपये वेतन देणार आहोत, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीत सुरु असलेल्या प्राथमिक शिक्षक 17 व्या अधिवेशनाचा शुभारंभ (Maharashtra Primary Teachers  Association 17th Session) केला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे प्रमुख उद्घाटक म्हणून उपस्थित होते. त्याच्या हस्ते अधिवेशानाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी दीपक केसरकर बोलत होते. त्यावेळी ही मोठी घोषणा केली. त्याचवेळी ते म्हणाले, यापुढे शिक्षकांच्या गाडीवर TR लिहिण्याबाबत परवानगी देण्याचा विचार सुरु आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केसरकर यांनी पुढे सांगितले की, यापुढे खुल्या गटाच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यात येणार आहे. तशी घोषणा शिक्षक अधिवेशनात केली. शिक्षकांवरील भार कमी करण्यात येणार आहे. शिक्षकांची अशैक्षणिक कामे वगळण्याचा जीआर काढला आहे. आता डॉक्टरांच्या गाडीवर DR असते त्याप्रमाणे शिक्षकांच्या गाड्यांवर TR असे लिहिण्याची परवानगी लवकरच देण्यात येईल, असे त्यांनी यावेळी संकेत दिलेत.


राज्य सरकार शिक्षकांचे पगार वेळेवर होण्यासाठी प्रयत्नशील असेल. मुलांसाठी असलेल्या टॉयलेट्सची सफाई यापुढे ग्रामपंचायत करणार आहे. टॉयलेट्स आणि कंपाउंडसाठी 590 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. शिक्षक समितीचे स्थान आमच्या हृदयात आहे, असे  मंत्री दीपक केसरकर म्हणाले.


मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले हे आश्वास...


यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणालेत, आई वडिलानंतर गुरुजींचे स्थान आदराचे आहे. कुंभार जसा मातीला आकार देतो त्याच पद्धतीचे शिक्षक काम करत आहेत. डॉक्टर जीवदान देतो तर शिक्षक खऱ्या अर्थाने जीवनाला आकार देतात. शिक्षकांना वेळेवर शाळेत पोहोचण्यासाठी त्यांच्या गाडीवर TR लावण्याबाबत विचार सुरु आहे. मी साधा कार्यकर्ता आहे. बोलायचं म्हणून बोलत नाही. मी जे बोलतो ते करुन दाखवतो. राज्यातील सर्व मुलामुलींना समान आणि गुणवत्ता पूर्ण शिक्षण देणार आहोत. कितीही टेक्नॉलॉजी आली तरीही शिक्षकांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. 30 हजार शिक्षकांची रिक्त पदे आपण भरत आहे. केंद्र प्रमुख पदे देखील भरणार आहोत. दुर्गम भागातील असल्यामुळे प्रत्येक घटकांची जाण आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.


धाडसी निर्णय घेणार सरकार आज राज्यात बसले आहे. जुनी पेन्शनचा विषय गांभीर्याने काम करत आहोत. कुठल्याही विषयाला बगल देण्याचे काम आम्ही करत नाही. अडीज वर्षातील थांबवलेले निर्णय आम्ही धाडसाने सुरु केले. मी काल कार्यकर्ता होतो आजही कार्यकर्ता आहे. उद्याही कार्यकरताच असेन, असे ते म्हणाले.