चंद्रपुरात प्रॉपर्टी डिलरची गोळी झाडून घेत आत्महत्या
चंद्रपूरमध्ये एका प्रॉपर्टी डिलरनं बंदुकीतून गोळी झाडून घेत आत्महत्या केलीय. चंद्रपूरच्या म्हाडा कॉलनी परिसरातील एका बंद कारमध्ये त्याचा मृतदेह आढळलाय.
चंद्रपूर : चंद्रपूरमध्ये एका प्रॉपर्टी डिलरनं बंदुकीतून गोळी झाडून घेत आत्महत्या केलीय. चंद्रपूरच्या म्हाडा कॉलनी परिसरातील एका बंद कारमध्ये त्याचा मृतदेह आढळलाय.
पदम जैन असं या प्रॉपर्टी डिलरचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे मंदिरात दर्शन घेत व्यावसायिक कामानिमित्त वणीला जात असल्याचे सांगून ते कारने घरून निघाले. मात्र दुपारपर्यंत त्यांचा संपर्क झाला नसल्याने कुटुंबियानी शोधाशोध सुरु केली. शेवटी रात्री पोलिसात तक्रार दाखल केली गेली.
पोलिसांनी मोबाईल टॉवर लोकेशनसह त्यांचा शोध सुरु केला, मात्र यात अपयश आले. अखेर म्हाडा कॉलनी परिसरात निर्जन ठिकाणी त्यांच्या कारमध्ये मृतदेह आढळला. आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय.