Pune Crime News : पुण्यात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील IT इंजिनीयरने आपल्याच 3 वर्षाच्या मुलाची हत्या केली आहे. झुडुपांत या चिमुरड्याचा मृतदेह आढळून आला. पोलिस तपासात हत्येचे कारण उघड झाले. मात्र, हे कारण समजल्यावर पोलिसही हादरले आहेत.
माधव टिकैती (वय 38 वर्षे) असे आपल्याच मुलाची हत्या करणाऱ्या निदर्यी पित्याचे नाव आहे. मिळलेल्या माहितीनुसार पती - पत्नी यांच्यात नेहमीच भांडण होत असे. यावेळी सुद्धा त्यांच्या भांडण झाली. पत्नीते विवाहबाह्य संबध असल्याचा माधव याचा संशय होता. यामुळेच त्यांच्यात खटके उडत होते. हा वाद इतका विकोपाला गेला ही माधवने स्वत:च्याच मुलाची हत्या केली आहे.
पत्नीशी वाद झाल्यानंतर माधव रागाच्या मुलाला घेऊन घराबाहेर पडला. यानंतर तो मुलाला घेऊन एका बारमध्ये बसला. माधवच्या पत्नीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावेळी मुलाचा मृतदेह जंगलात आढळून आला. पोलिसांनी यादरम्यान चौकशी केली असता धक्कादायक सत्य उघडकीस आले
पोलिसांनी CCTV फुटेज तसेच माधवचे मोबाईल लोकेशन ट्रॅक करुन त्याला एका लॉजमऊन ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान मुलाच्या वडिलांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. पती-पत्नीच्या वारंवार होणाऱ्या भांडणातून रागाच्या भरात त्यांनीच मुलाला संपवले आणि मृतदेह जंगलात फेकून दिला. पुण्यातील चंदन नगर पोलीस ठाण्यात माधव विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
वाशिमच्या बाभुळगाव येथील अनिकेत सादूडे या 14 वर्षीय मुलाच्या हत्येप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आलीये.. दोन्ही आरोपींना 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये.. दोन्ही आरोपींनी 12 मार्चच्या रात्री अपहरण करून हत्या केली होती. आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी साठ लाख रुपये खंडणी मागणारे पत्र अनिकेतच्या घरासमोर टाकले होते. अखेर 9 दिवसानंतर पोलिसांनी खुनाचा उलगडा करत या दोन्ही आरोपींना अटक केलीये.. कोर्टानं दोघांनाही आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.